जामखेड न्युज——
कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री क्रीडा संकुल व मातोश्री लालआखाडा यांच्या माध्यमातून भव्य गणेश उत्सव सजावट स्पर्धा जामखेड शहरात संपन्न होत आहे. उत्कृष्ट ठरणाऱ्या गणेश मंडळांस पारितोषके देवून सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत शहरातील गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेवक मोहन पवार यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले.

जामखेड येथे मातोश्री क्रीडा संकुल व मातोश्री लालाखाडा यांच्या वतीने भव्य गणेशोत्सव सजावट स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक मोहन पवार यांच्या पुढाकारातून होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कसलेही शुल्क गणेश मंडळाला आकारले जाणार नाही.उत्कृष्ट ठरणाऱ्या गणेश मंडळांस पारितोषके देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

नगरसेवक मोहन पवार नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रसिद्ध आहेत. यावर्षी ही त्यांनी गणेश मंडळांसाठी चांगला उपक्रम हाती घेतला आहे.
– उत्कृष्ट सजावट करणाऱ्या गणेश मंडळाला-
प्रथम पारितोषिक 11000 रुपये
द्वितीय पारितोषिक 7000 रुपये
तृतीय पारितोषिक 3000 रुपये
दिले जाणार आहेत.


या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या गणेश मंडळासाठी कसलेही शुल्क आकारले जाणार नाही .तसेच स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या अन्य मंडळांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

– स्पर्धेचे निकष अनुक्रमे पुढील प्रमाणे
पर्यावरण पूरक गणेश मूर्ती
पर्यावरण पूरक सजावट
ध्वनी प्रदूषण विरहित वातावरण
समाज प्रबोधन – उदाहरणार्थ पाणी वाचवा, बेटी पढाव बेटी बचाव
अंधश्रद्धा निर्मूलन
देशभक्ती
सामाजिक सलोखा सजावट
शालेय
आरोग्य
शिक्षण इतर सजावट
महिला वंचित घटक सामाजिक बाबतीत सजावट व कार्य
गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा पाणी प्रसाधन ग्रह
वैद्यकीय प्रथम उपचार
परिसर स्वच्छता
वाहतुकीस अडथळा येणार नाही असे नियोजन
आयोजनातील शिस्त
पारंपारिक सांस्कृतिक भजन
लेझीम
टिपरी ढोलीबाजा इत्यादी आकर्षक शांततेत मिरवणूक
परीक्षणाचे सर्व अधिकार समिती आयोजकांना असतील
सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांनी खालील व्यक्तीशी संपर्क साधावा
संतोष घोलप सर 99 60 47 5000
उमेश माळवदकर 94 23 75 17 51
सुरज दादा पवार 91 50 50 50 72
असे आवाहन आयोजक नगरसेवक मोहन पवार यांनी केले आहे.








