जामखेड न्युज——
जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करावयास हवा. यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना अनेक संकटे समोर उभी ठाकतात; पण या संकटांना न डगमगता आपण पुढे मार्गक्रमण करत राहिल्यास हमखास यश प्राप्त होते. असे मत गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांनी व्यक्त केले.


ज्ञानभैरव वाचनालय शिऊर यांच्या वतीने परिसरात कर्तृत्व मिळवणाऱ्या व्यक्तीचा शाळेचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच हनुमान उतेकर,उपसरपंच विठ्ठल देवकाते, ग्रामपंचायत सदस्य सिध्देश्वर लटके, अंकुश तनपूरे, भाऊ पिंपरे, गौतम निकम, भगवान समुद्र, सोसाटीचे संचालक विठ्ठल चव्हाण, बदाम निंबाळकर, अनिल क्षिरसागर, आत्माराम फाळके, टिम ज्ञानभैरव विठ्ठल सुर्वे, लिंगाजी देवकाते, मेनिमाथ लटके, नाना सावंत, किरण पवार, भाऊसाहेब अभिमान तनपूरे,मारूती गाडे, भाऊसाहेब रघुनाथ तनपूरे, राम तनपूरे, शिवम लटके, भैय्या देवकाते सर्व युवा टिम, दादा निकम, भिकुआबा समुद्र, नाना तनपूरे, सुदाम सुळे, शरद तनपूरे, कांताआबा झरकर, ग्रामस्थ शिऊर उपस्थित होते. मिरवणुकीत वाजवण्याचे काम झिमा वाघमारे व महादेव वाघमारे यांनी छानपैकी केले.काही सत्कार मुर्ती त्यांच्या अडचणी मुळे येऊ शकले त्यांचा सत्कार नंतर ठेवण्यात येईल असे आयोजकांच्या वतीने करण्यात आले.


राज्यात स्वच्छ विद्यालयाचा प्रथम क्रमांक बसरवाडी शाळा हरियाणा येथील कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा गावाचा सुपुत्र सुजय तनपुरे उत्कृष्ट मंडलाधिकारी बाळासाहेब लटके, नवोदयला निवड झालेली साक्षी लटके, तालुक्यात एनएमएमएस परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणारा अभिजित निकम पर्यावरण संतुलनासाठी पहिल्या आयएसओ व राज्यातील स्वच्छ विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावणारी बसरवाडी शाळा तसेच शेजारी सावरगावची जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यात आदर्श करण्यासाठी प्रयत्न करणारे भगवान समुद्र यांचा सन्मान करण्यात आला.
आज सकाळी आठ वाजता सत्कारमूर्तीचे फेटा बांधून वाजत गाजत भैरवनाथ मंदिर येथे देवदर्शन घेण्यात आले.त्यानंतर ज्ञानभैरव वाचनालय येथे कार्यक्रमास सुरूवात झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास खैरे साहेबांच्या निवडीची सुचना विठ्ठल सुर्वे सर यांनी मांडली.तर अनुमोदन सुनिल कुमटकर सर यांनी दिले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक आबासाहेब वीर सरांनी केले.त्यांनी आपल्या प्रस्ताविकात ज्ञानभैरव वाचनालयाची भूमिका मांडली.आज होण्याऱ्या सर्व सत्कार,त्यांच्या कार्याचा उल्लेख केला.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवर पाहुण्याचा सत्कार करण्यात आला.यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरूवात झाली.
स्वच्छ विद्यालय पुरस्कारात राज्यात प्रथम आलेल्या शाळेचा सन्मान करण्यात आला.ग्रामपंचायत सदस्य भाऊ पिंपरे,शाळा व्य.समितीचे अध्यक्ष मारूती निकम,उपा.गौतम निकम,सदस्य श्रीराम मुटके,ग्रामस्थ सिद्धेश्वर रोडगे,विद्यार्थी कल्याणी निकम,मनिषा मुटके,मुख्या.एकनाथ चव्हाण,सहशिक्षक तात्या घुमरे हे सर्व उपस्थित होते.त्यानंतर शिऊर गावचे भूषण हरियाना येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धामध्ये गोल्ड मेडल जिंकलेला आमचा शिऊर गावाचा अभिमान लाडका सोन्या उर्फ संजय उर्फ सुजय तनपूरे,त्याचे वडिल नागनाथ तनपूरे,भाऊ विकास तनपूरे व मित्रमंडळ यांचा सन्मान करण्यात आला.गावाचे क़र्तबगार भूमिपुत्र बाळासाहेब लटके साहेब उत्कृष्ट सर्कल म्हणून कामकाज केल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.नवोदयला निवड झाल्यामुळे साक्षी भागवत निकम हिचा सन्मान आजोबा श्रीपती निकम यांनी स्विकारला,सावरगावची शाळा जिल्हा आदर्श शाळा करणारे शिऊर गावचे भूमिपुत्र सावरगाव शाळेचे मुख्या.भगवान समुद्र सर,दादा सपकाळ, शंतीनाथ सपकाळ,साईनाथ सपकाळ व टिम सावरगावचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला.अभिजित गणेश निकम याचा NMMS परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक आला.अभिजितचा सन्मान वडिल गणेश निकम यांनी स्विकारला.मा.सरपंच सोमनाथ तनपूरे यांनी पर्यावरण संतुलनासाठी बसरवाडी येथे 101 झाडाची लागवड केली.त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.तो सन्मान भाऊ तनपुरे यांनी स्विकारला.वायरमन निवड झालेला आबा अंगद देवकाते याचाही सन्मान करण्यात आला.बळी वाघमारे यांची कन्या पायलट झाली.तो सन्मान भिवा वाघमारे यांनी स्विकारला.आरोग्य सेवक म्हणून नियुक्त झालेले हनुमंत व महादेव निंबाळकर यांचा सन्मान बदाम निंबाळकर ,बाबूआण्णा निंबाळकर यांनी स्थिकारला.या कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिऊर बाला उपक्रमासाठी चांगभलं ग्रुपवर ऑनलाईन 20500रू जमा झाले होते ती रक्कम शाळा व्य.अध्यक्ष राजाभाऊ तनपुरे,सदस्य हनुमंत माने, मुख्या.संतोष वांढरे,नामदेव गर्जे यांच्याकडे जमा केली.सत्कारमूर्तीचे मनोगतात बसरवाडीचे शा.व्य.स.अध्यक्ष मारूती निकम यांनी दहा वर्षापासून बसरवाडी शाळेचा शै.आलेख सांगितला.बसरवाडी शाळेचे मुख्या.एकनाथ चव्हाण सर यांनी iso पुरस्कार,जिल्हा गुणवत्ता पुरस्कार आणि स्वच्छ विद्यालय पुरस्कार,छोटया वाडीचा तीन वेळा मोठा बहुमान झाल्याचे सांगितले.मंदिराला शिखर बांधतो आणि कळस बसवतो.जेणेकरून ते लांबून दिसावे.आज जिवन शिक्षण मंदिर बसरवाडी शाळेचे यशाचे शिखर राज्यात प्रथम आल्यामुळे मुंबईवरून दिसत असल्याचे सांगीतले.