समविचारी पक्षाने एकत्रित येऊन तिसरी आघाडी करावी ॲड. डॉ. अरूण जाधव अझहर काझी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

0
228
जामखेड न्युज——
    जामखेड शहरातील अनेक समविचारी पक्षाने प्रमुख नेते एकत्रीत येऊन काझी फार्म येथे बैठक संपन्न झाली यात भाजपा व मित्रपक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष यांच्या बरोबर न जाता सर्वानी एकत्रित येऊन तिसरी आघाडी स्थापन करावी व अझहर काझी यांची नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली अशी सूचना वंचित बहुजन आघाडीचे ॲड. डॉ. अरूण जाधव  यांनी मांडली सर्वानी पाठिंबा दिला. 
     दि.३० ऑगस्ट रोजी अझहरभाई काझी यांच्या नेतृत्वाखाली काझी फार्म येथे विविध संघटना, विविध पक्ष यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी १५० प्रमुख लोक उपस्थित होते. व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या बैठकीची प्रस्तावना व भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राज्य भटके- विमुक्त समन्वय ॲड.डॉ. अरुण जाधव यांनी मांडली.
 जामखेड नगरपरिषद निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी समविचारी पक्षाला सोबत घेऊन नगराध्यक्ष पदासाठी अझहर भाई काजी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राज्य भटके- विमुक्त समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी मांडली.
   या बैठकीमुळे खरोखरच जर तिसरी आघाडी झाली तर भाजपा व समविचारी पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षाला मोठा फटका बसू शकतो अशी लोकांमध्ये चर्चा आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here