नगरच्या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा दिवाळीच्या दिवशी होईल- खासदार डॉ. सुजय विखे पाटील

0
228
जामखेड न्युज——
अहमदनगर महापालिकेत भाजपचे महापौर व उपमहापौर असताना शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. तिच विकासकामांची परंपरा पुढे चालू ठेवू. शहरातील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा दिवाळीच्या दिवशी होईल, असे आश्वासन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज अहमदनगर येथे दिले.
मिसाळ गल्ली येथे काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन खासदार डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते आज झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी उपमहापौर मालण ढोणे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, धनंजय जाधव, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे आदी उपस्थित होते.
सुजय विखे पाटील म्हणाले, नगर शहराचा प्रचंड विकास होताना सामान्य नागरिकांना पहायला मिळत आहे. ढोणे यांच्या वार्डातील कामासाठी साडेतीन कोटीचा निधी देण्यात आला आहे. अहमदनगर महापालिकेच्या हद्दीतील विविध वॉर्डमध्ये 50 ते 60 कोटी रुपयांचा विकासनिधी देण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, की अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे काम भाजपचे महापौर व उपमहापौर असतानाच सुरू झाले. दिवाळीच्या दिवशी नगर शहरातील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा घेण्यात येईल नगर शहरातील प्रलंबित विकासकामे हाती घेतली जातील. शहर विकास आराखड्यातील रस्त्यांची कामांसाठी भूसंपादन केले जाईल. शहरातील कुठल्याही शासकीय कामाच्या भूसंपादनास विलंब होणार नाही. आगामी सहा महिन्यांत शहरातील विकासकामांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली गती देण्यात येणार आहे.
मागील अडीच वर्षांत नगर शहरात भाजपच्या सत्ता काळात जे काम पहायला मिळाले. तीच विकासकामांची परंपरा पुढे नेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here