जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज—-( सुदाम वराट)
परिसरातील भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी वरदान ठरलेल्या शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी तर्फे
भव्य अशी १६०० मीटर धावण्याची स्पर्धा तसेच अग्निपथ परीक्षार्थींचा निरोप समारंभ याचबरोबर त्यांना भरतीसाठी योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले आहे.

जामखेड येथिल शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर ॲकॅडमीच्या वतीने भव्य १६०० मिटर धावण्याच्या स्पर्धा व अग्निपथ भरती परिक्षार्थी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी ५००० रूपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस असून एकुण पाच स्पर्धकांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर सैन्य दलासाठी होणाऱ्या अग्निपथ भरतीसाठी तयारी कशी करावी यासाठी शिवनेरी अकॅडमीचे सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे हे मार्गदर्शन करणार आहेत.

रविवार दि. २१ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता शिवनेरी अकॅडमीच्या प्रांगणात हे दोन्ही कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, उद्योजक रमेश गुगळे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, माजी सभापती सुर्यकांत मोरे, डॉ. भगवान मुरूमकर, उद्योजक रमेश आजबे, उपमहाराष्ट्र केसरी बबन (काका) काशिद आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार.

यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन त्रिदल आजी-माजी सैनिक संघाच्या वतीने करण्यात आले आहे. अग्नीपथ भरती प्रक्रियेसाठी फार्म भरलेले सर्व विद्यार्थी या मोफत मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेऊ शकतात. तसेच या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन शिवनेरी अकॅडमीचे संचालक से निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केले आहे.