न्यू इंग्लिश स्कूल राजुरी मध्ये दहीहंडी उत्साहात साजरी

0
195
जामखेड न्युज——
    न्यू इंग्लिश स्कूल राजुरी येथे दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक हजर होते. गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव विद्यालयात सर्व बालगोपाळांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला, विद्यालयातील इयत्ता 5 वी.6 वी तील विद्यार्थ्यांनी विविध वेशभुशा करुन नॄत्य सादर केले. 
   दहीहंडी नंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप केला गेला. या कार्यक्रम प्रसंगी गावातील पालक, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने सह सर्व शिक्षक हजर होते. 
कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम विद्यालयाच्या जेष्ठ अध्यापिका श्रीमती सुनितापिसाळ सह  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही परिश्रम घेतले 
दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो.
बाळगोपाळ श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्ताने दहीहंडी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.
असा साजरा करतात दहीहंडी उत्सव
दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजोशीर असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. याला फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा.
 तो आपला तोल सांभाळत हंडी फोडतो. हंडी फोडणाऱ्या मंडळांना विविध भेटवस्तू देऊन गौरविण्यात येते.
दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल राजुरी येथे मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here