जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
गेल्या चार वर्षापासून कलम ३९५, आर्म अॅक्ट सह विविध गुन्ह्यांमध्ये फरारी असणाऱ्या ३ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे.
जामखेड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पोलीस स्टेशनचा चार्ज हातात घेतल्यापासूनच तालुक्यातील गुन्हेगारी व गुन्हेगार यांना आळा घालण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आज केलेल्या कारवाईस खुप महत्व प्राप्त झाले आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील इतर गुन्हेगारांमध्येही खळबळ उडाली आहे.
गेली चार वर्षांपासून फरार असलेले प्रदीप राजू कांबळे, बाळू सिताराम मिसाळ व विशाल जगन्नाथ जाधव हे सोनेगाव ता. जामखेड येथील रहिवासी असलेले आरोपी सोनेगाव या त्यांच्या गावी आले असल्याची खबर गुप्त बातमीदारामार्फत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात, पोलीस काॅन्स्टेबल अविनाश ढेरे, संग्राम जाधव, आबासाहेब आवारे, अरूण पवार, विजय कोळी, संदीप राऊत, गणेश गाडे या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले एक पथक तयार करून हे आरोप पकडण्यासाठी रवाना केले. त्यानुसार या पथकाने सापळा रचत दि. ९ मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तीनही अरोपींना अटक करून पोलीस स्टेशन जामखेड येथे हजर केले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई राजेंद्र थोरात व पोलीस काॅन्स्टेबल सचिन देवढे हे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक व कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याप्रकारची कारवाई यापुढे सुरूच राहणार असल्याची माहिती पो. नि. संभाजी गायकवाड यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.