जामखेड न्युज——

संतोष वराट या चालकाने पदरमोड करून आपल्या देवावरील श्रद्धेपोटी श्री साकेश्वर महाराजांचा फोटो असलेले बोर्ड बनवून पाटोदा-मुंबई साकत मार्गी जाणाऱ्या गाडीला बसविण्यात आला यावेळी वाहक व चालकाचा सन्मानही करण्यात आला. या बद्दल संतोष वराटचे कौतुक होत आहे.

संतोष वराट हा साकत येथील रहिवासी असून तो कोकणात चालक म्हणून एसटी महामंडळात नोकरीस आहे. गावातील ग्रामदैवत श्री साकेश्वर महाराज एक जागृत देवस्थान म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे.

देवावरील आपल्या श्रद्धेपोटी संतोषने आपल्या देवाचा फोटो असलेला बोर्ड साकतहून जाणाऱ्या – येणाऱ्या गाडीला हवा म्हणून तयार करून घेतले व आज सकाळी पाटोदा मुंबई गाडीला बसविण्यात आले. यावेळी चालक व वाहकाचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी संतोष वराट, संतोष लहाने, लखुळ वराट, महादेव वराट, अशोक लहाने, गणेश वराट, ऋषीकेश वराट, गणपत सांगळे यांच्या सह अनेक ग्रामस्थ हजर होते.
पाटोदा मुंबई साकत मार्गे बसला देवाचा फोटो असलेला बोर्ड बसविल्या मुळे संतोष वराट चालक याचे कौतुक होत आहे.