जामखेड न्युज——

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साकत ग्रामपंचायतने हर घर तिरंगा घर घर तिरंगा या साठी घरोघरी तिरंगा ध्वजाचे वाटप केले होते. काल दि. १३ रोजीही देशसेवकाच्या हस्ते ध्वजारोहण केले होते आजही देशसेवकाच्या हस्ते ध्वजारोहण करत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. नितीन सरोदे फौजी यांच्या हस्ते ध्वजारोहण केले.

ध्वजारोहण संपन्न होताच फौजी नितीन सरोदे हे देशसेवेसाठी देशरक्षणासाठी राजस्थान येथील गंगानगर येथे रवाना झाले. सर्वानी त्यांना निरोप दिला.

यावेळी सरपंच मनिषा पाटील, हनुमंत पाटील, उपसरपंच राजू वराट, फौजी नितीन सरोदे, माजी चेअरमन प्रा. अरूण वराट, महादेव मुरूमकर, दिनकर मुरूमकर, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, महादेव मत्रे, अर्जुन रासकर, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, अतुल दळवी, हरिभाऊ वराट, रामहरी वराट, राम मुरूमकर, महादेव वराट, गोरख वराट, सतिष वराट, बाळू मोरे, रज्जू साखरे, आश्रू सरोदे, आरोग्य कर्मचारी डॉ. प्रशांत पारखे, डॉ. जेथे, अंगणवाडी सेविका मीराबाई वराट, मनिषा वराट, मनिषा सानप यांच्या सह अनेक ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

साकत ग्रामपंचायतने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी जाऊन तिरंगा ध्वजाचे वाटप केले आहे अगदी घर, दुकान व झोपडीवरही डौलाने तिरंगा ध्वज फडकत आहे. सगळेच वातावरण तिरंगा मय झाले आहे.

सकाळी श्री साकेश्वर विद्यालयातील मुलांनी हातात तिरंगा ध्वज घेत संपूर्ण गावात प्रभात फेरी काढली होती. नंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे देशसेवक नितीन सरोदे फौजी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले ध्वजारोहण संपन्न होताच नितीन सरोदे हे देशाच्या रक्षणासाठी सीमेवर राजस्थान येथील गंगानगर येथे रवाना झाले.
काल आणी आज देशसेवकाच्या हस्ते ध्वजारोहण करत साकत ग्रामपंचायतने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.