Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या सावधान जामखेड तालुक्यात बिबट्याचा वावर धामणगाव येथे आढळला मृत अवस्थेत बिबट्या वनविभागाने...

सावधान जामखेड तालुक्यात बिबट्याचा वावर धामणगाव येथे आढळला मृत अवस्थेत बिबट्या वनविभागाने केले अंत्यसंस्कार

0
353
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज——
 
   जामखेड तालुक्यातील धामणगाव येथे गट नंबर 440 वनदरा परिसरात मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्यामुळे भितीचे वातावरण पसरले असले तरी हा बिबट्या रस्ता चुकुन आला असल्याचा अंदाज व्यक्त करत त्याचा मृत्यू उपासमारीने झाला असावा असा अंदाज असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी सांगितले असून सरपंच महारूद्र महारनवर व ग्रामस्थांच्या सहकार्याने मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

जामखेड तालुक्यातील धामणगाव परिसरात एक नर जातीचा बिबट्या आढळून आला. डोंगराळ भागात हा मृत बिबट्या आढळून आल्याने धामनगाव परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर बिबट्याचा मृत्यू झुडपाच्या वेलीमध्ये पाय आडकुन व उपासमारीने झाला आसल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी दिली. 
     पाच महीन्यापुर्वी मोहरी परीसरात बिबट्याची काही पिल्ले आढळून आली होती. मात्र मागील काही महिन्यांपासून बिबट्याचे दर्शन झाले नव्हते. धामणगावच्या घटनेवरून डोंगराळ परीसरात बिबट्याचा वावर होत आहे हे नाकारून चालणार नाही. आता या घटनेमुळे बालाघाटात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित झाले आहे. 
हा मृत आवस्थेतील बिबट्या धामणगाव वनविभागाच्या वनदरा हद्दीत आढळून आला आहे. साधारण चार ते पाच दिवसापुर्वीच या बिबटय़ाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. या भागात मादी बिबट्या पण असु शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध रहावे असे अवाहन धामणगावचे सरपंच महारूद्र महारनवर यांनी केले आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी प्रविण उबाळे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कुलदीप चौरै, किसन पवार, शिवाजी चिलगर, शहाजी नेहरकर, भाऊसाहेब भोगल, हे घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाची पुढील कार्यवाही सुरू करून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कुलदीप चौरै यांनी जाग्यावरच मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. सदर बिबट्याचा एक पाय याठिकाणी आसलेल्या झुडपातील वेलात अडुन झाला आहे . परीणामी त्याला शिकार करता आली नाही . त्यामुळे उपासमार झाली आसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे तसे शवविच्छेदनामध्ये आढळून आले आसल्याची माहिती वनविभागाकडुन सांगण्यात आली. 
सर्व शेतकरी बांधवानी सावध रहावे, सरपंच महारूद्र महारनवर यांचे आवाहन
धामणगांव  परिसरातील सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की धामणगांव वन विभाग हद्दी मध्ये वनदरा येथे  बिबट्या मृत अवस्थेत आढळुन आला आहे. सदर बिबट्या हा नर असुन या परिसरात मादी पण असु शकते. सदर मृत बिबट्याची माहिती वन विभागाला कळविली असुन वन कर्मचारी सदर ठिकाणी हजर झाले आहेत. सर्व शेतकरी बांधवानी सावध रहावे ही विनंती. असे आवाहन  यांनी यावेळी केले आहे. 
चौकट
  बिबट्या हा दिवसभरात साधारणपणे १०० कि.मी.  चालत आसतो. हा मृत बिबट्या बाहेर जिल्ह्यातून भटकत धामनगाव या ठिकाणी आला आसावा. त्याचा पाय झुडपाच्या वेलीत आडकला होता. त्यामुळे त्याला जागेवरून हालचाल करता येत नव्हती. त्याचे शवविच्छेदन केले असुन उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे . जेथे मृत्यू झाला त्याच परीसरात त्याचा दफनवीधी करण्यात आला आहे . ( वनपरिक्षेत्र अधिकारी , मोहन शेळके )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!