Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा संपन्न तंज्ञाचे मार्गदर्शन

जामखेडमध्ये लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा संपन्न तंज्ञाचे मार्गदर्शन

0
429

जामखेड न्युज——

परिसरात हळगाव, पिंपरखेड, चोंडी, बावी, फक्राबाद, गिरवली हा भाग लिंबाचे आगार समजला जातो या परिसरातील शेतकर्यांना फायदा व्हावा म्हणून तंज्ञ मार्गदर्शकातर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती याचा फायदा लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. 

 

कर्जत व जामखेड तालुक्यामध्ये लिंबू उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून दोन्ही तालुक्यात लिंबाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. लिंबू उत्पादक बागायतदारांना योग्य मार्गदर्शन मिळावे व लिंबाचे जास्तीत जास्त उत्पादन वाढावे या दृष्टिकोनातून व राजेंद्र दादा पवार यांच्या संकल्पनेतून बहार तंत्रज्ञान व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन जामखेड तालुक्यातील धानोरा व कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे आयोजित करण्यात आले होते.

 

कर्जत-जामखेड तालुक्यातील सर्व लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना खत, पाणी, रोप, कीड नियंत्रण व झाडांची छाटणी या सर्वांचे व्यवस्थापन करण्यासंदर्भातील मार्गदर्शन राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूरचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ अंबादास हूच्चे सर यांच्या माध्यमातून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे चेअरमन राजेंद्रदादा पवार हे होते.

उन्हाळ्याच्या हंगामात लिंबाला सर्वात जास्त भाव असतो तसेच सर्वाधिक मागणी देखील असते. त्यामुळेच आत्ताच लिंबाच्या व्यवस्थापनाबद्दल योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळाले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल व येणाऱ्या काळात आर्थिक नफा देखील मिळेल. तसेच कमी खर्चात चांगले व्यवस्थापन शेतकऱ्यांना करता येईल. कर्जत-जामखेड शेतकरी उत्पादक कंपनी, एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यातून या व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवला.

आतापर्यंत कर्जत-जामखेड मतदारसंघात २०० हून अधिक अशा प्रकारचे विविध कार्यक्रम पार पडले आहेत. ज्यामध्ये शेतकऱ्यांना पिकासंदर्भातील विविधता व शेती संदर्भातील व्यवस्थापन अशा विविध गोष्टी घेऊन शेतकऱ्यांना अधिकचा पैसा कसा मिळवून देता येईल या दृष्टीने आमदार रोहित दादा पवार सतत प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!