Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या कुर्ला येथील सिद्धिविनायक चित्र शाळेत भारत पाक बॉर्डरच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा...

कुर्ला येथील सिद्धिविनायक चित्र शाळेत भारत पाक बॉर्डरच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न

0
405

 

जामखेड न्युज——

 मुंबई भारत पाक बॉर्डरच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा मोठ्या हर्ष उल्हासात हिंदूचा पवित्र महिना श्रावणातील पावसाच्या कोसळणार्‍या सरीत बुधवारी कुर्ला येथील भारतीय नौसेनेच्या गेटजवळील सिद्धिविनायक चित्र शाळेत

 

भारत पाक बॉर्डरच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा मानव अधिकार कार्यकर्त्या ईशर दीदी, प्रोग्रेसिव्ह नेशन व शिवनेर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष छत्रपती दादा आवटे यांच्या हस्ते थाटामाटात संपन्न झाला. दिव्यांग मूर्तिकार विक्रांत पांढरे हे राजाची गेली १२ वर्षापासुन सुबक व मनमोहक मूर्ती साकारत आहेत.

 

त्यावेळी मानव अधिकार कार्यकर्त्या ईशर दीदी,
प्रोग्रेसिव्ह नेशन व शिवनेर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष छत्रपती दादा आवटे, मंगेश मस्तूद, प्रभाकर चव्हाण, विनित पटेल, शीतल खारवा, जगदीश भाई, अजय घगवे व पदाधिकारी उपस्थित होते. 

भारत पाक बॉर्डरचा राजा दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मोठ्या उत्साहात भारत पाक सीमेवर पाठविण्यात येत आहे. गेली १२ वर्ष म्हणजे आता एक तप पूर्ण झाले आहे. या वर्षी भारताचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने यामध्ये आमच्या भारतीय जवानाचे देखील महत्वाचे योगदान आहे.

 

ते अहोरात्र ऊन पाऊस वारा यांची तमा न बाळगता जिद्दीने आपल्या देशाचे रक्षण करत आहेत. आपल्या भारतीय जवानांना देखील सीमेवर गणेशोत्सव साजरा करता यावा म्हणून मानव अधिकार कार्यकर्त्या ईशर दीदी आणि प्रोग्रेसिव्ह नेशन व शिवनेर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष छत्रपती दादा आवटे दरवर्षी मुंबई वरुन स्वराज एक्स्प्रेसने मूर्ती जम्मू व काश्मीर येथील एलओसी पुछं या ठिकाणी पाठवतात. त्या ठिकाणी भारतीय जवान मोठ्या उत्साहात मूर्ती वाजत गाजत जम्मू येथे दिमाखात स्वागत करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!