जामखेड न्युज——
स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त प्रत्येकांनी आपल्या घरावर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा, असे आवाहन सरकारने केले आहे .
गावागावातील घरोघरी तिरंगा ध्वज पोहोचवण्याची जबाबदारी सरकारने टपाल खात्यावर सोपवली आहे. प्रत्येक टपाल कार्यालयात ध्वज उपलब्ध आहेत, त्याची किंमत 25 रूपये आहे.
या अभियानात कागदी झेंडे किंवा प्लास्टिकचे झेंडे देण्याऐवजी कापडी ध्वज देण्याची योजना सरकारने आखली आहे. त्यामुळे या अभियानासाठी लागणारे तिरंगा ध्वज टपाल कार्यालयात उपलब्ध झाले आहेत.
ध्वज खरेदीसाठी लोकांना टपाल कार्यालयात जावे लागणार आहे, राष्ट्रध्वज सर्वसामान्यांना कमी खर्चात उपलब्ध करून दिला जात आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी झेंडा फडकवण्यासाठीही लोकांना प्रबोधन करण्यात येत आहे,
कर्जत उपविभागातील सर्व टपाल कार्यालयात २५ रुपयात तिरंगा ध्वज उपलब्ध आहे,
अशी माहिती उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख यांनी दिली. यावेळी बाळासाहेब बाळुंजकर, पोस्टमास्तर कर्जत
दिलीप खरात,सुनिल धस, बापुराव पंडीत,संतोष गदादे, दिपक काळे, चंद्रकांत नेटके आदि उपस्थित होते.