जामखेड न्युज——
गेल्या वीस वर्षांपासून जामखेडच्या नागपंचमी सणाची काशीद कुटुंबीयांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. चाळासाठी असणारी पंचमी महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात हगाम्यासाठी प्रसिद्ध झाली आहे. पुढील वर्षी क्रमांक एकची कुस्ती हिंद केसरी रोहित पटेल खेळणार आहे. त्याच्या बरोबर महाराष्ट्रातील कोणतातरी मल्ल झुंजेल असे मत माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांनी एक क्रमांकाची कुस्ती बालारफिक शेख विरुद्ध अक्षय शिंदे उप महाराष्ट्र केसरी बीड यांची लावताना व्यक्त केले.

नागेश्वराच्या पावन भूमीत कै.विष्णू वस्ताद काशीद उर्फ बाबा यांच्या स्मरणार्थ भव्य जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान
भरविण्यात येते यावेळी आमदार शिंदे बोलत होते. यावेळी
प्रमुख उपस्थिती माजी मंत्री प्रा. राम शिंदे, हिंद केसरी मा.रोहितजी पटेल, उपमहाराष्ट्र केसरी मा. बबन (काका)काशीद आणि मराठा भाषिक महासंघाचे अध्यक्ष मराठा गौरव मा. युवराज (भाऊ) काशीद ,भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, हिंद केसरी रोहित पटेल, गुलाब बर्डे, बाळासाहेब आवारे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, डॉ. भगवान मुरूमकर, प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सावळेश्वर उद्योग समूहाचे रमेश आजबे, शिवसेना तालुका प्रमुख संजय काशीद, सतिश आबा शिंदे, रवी सुरवसे,
अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, ईश्वर मुरूमकर, कांतीलाल वराट, पंडित मामा साबळे, जयदत्त धस, गौतम उतेकर, सोमनाथ राळेभात, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, सोमनाथ पाचारने, प्रविण घुले, विकास मासाळ, बाजीराव गोपाळघरे, गोरख घनवट, नागराज मुरूमकर, पांडुरंग उबाळे, महारुद्र महारनवर, किरण मुळे, महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख यांचे वडील आदम शेख यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक कुस्ती शौकीन व मल्ल मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मानाच्या पाच कुस्त्यांचे निकाल पुढीलप्रमाणे विशाल पाटील विरुद्ध विशाल मांडरे बरोबरीत,
समीर शेख विरुद्ध साहिल पाटील – समीर विजेता
विजय मांडवे विरुद्ध विजय पवार विजय मांडवे विजय
मुन्ना झुंझुरके विरुद्ध विरुद्ध भारत मदने बरोबरीत
आणी शेवटची क्रमांक एकची कुस्ती करमाळा येथील बालारफिक शेख विरुद्ध अक्षय शिंदे उप महाराष्ट्र केसरी बीड अशी रंगली होती सुमारे पंधरा मिनिटे भर पावसात कुस्ती शौकीनानी या कुस्तीचा आनंद लुटला शेवटी कुस्ती बरोबरीत सुटली.
या कुस्ती साठी समालोचक म्हणून शंकर आण्णा पुजारी तर हलगी वादक राजू आवळे अमित आवळे यांनी कुस्ती शौकीनांचे कान व डोळे तृप्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व सदिच्छा मंडळाचे जिल्हा अध्यक्ष नारायण राऊत, ज्ञानेश्वर कोळेकर यांनी केले.
कुस्ती मैदानाचे हे 20 वे वर्ष होते या मैदानाच्या आयोजन श्री.अजय (दादा )काशीद मित्र मंडळाच्या या वर्षी तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान तसेच तालुक्यातील शालेय खेळाडू विद्यार्थ्यांचा सुद्धा स्पोर्ट टी शर्ट देवून सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात आला.
पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.