जमिन नावावर करण्यासाठी आजोबाला मारहाण तर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पाहुण्यांचा घेतला चावा

0
180
जामखेड न्युज——
जमीन नावावर कर म्हणत नातवाने आजोबासह आत्याच्या नवऱ्याला मारहाण व चावा घेऊन जखमी केले आहे. सदरचा प्रकार हा आळजापूर तालुका करमाळा येथे 31 जुलै रोजी रात्री अकरा वाजता घडला आहे. यामध्ये फिर्यादी अर्जुन घोडके वय 85 व त्यांचे जावई जखमी झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अर्जुन श्रीपती घोडके वय 85 हे आळजापुर येथे शेती करतात.
ते 31 जुलै रोजी रात्री आपल्या मुलीच्या घरी झोपलेले असताना त्या ठिकाणी रात्रीच्या सुमारास त्यांचा नातू कशिष आप्पा घोडके राहणार आळजापूर हा तिथे आला व त्यांनी दरवाजावर लाथा मारून शिवीगाळ सुरू केली.
त्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर शेजारी असलेला दगड उचलून त्यानी आपल्या आजोबाच्या हातावर मारला . यामध्ये उजव्या हाताला गंभीर जखम झाली आहे.
तर भांडण सोडवण्यासाठी आलेले अर्जुन घोडके यांचे जावई यांना चावा घेऊन जखमी केले आहे. या प्रकरणात दोघेही सासरा व जावई जखमी झाले आहे याप्रकरणी नातवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here