Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या पठाण यांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद – राजेंद्र कोठारी मुख्याध्यापक जुलफुकारअली पठाण...

पठाण यांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद – राजेंद्र कोठारी मुख्याध्यापक जुलफुकारअली पठाण यांचा सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न

0
365
जामखेड न्युज——
   गेली ३५ वर्षे शिक्षण क्षेत्रात इमानेइतबारे निष्कलंक सेवा करत अनेक आज पठाण सर सेवानिवृत्त होत आहेत पस्तीस वर्षाच्या कालावधीत अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटविला शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २००२  साली शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार तर २०२२ साली गुणरत्न मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला आहे. शालेय परिसराची स्वच्छता व झाडी पाहून मन प्रसन्न झाले आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी व्यक्त केले. 
 
दि पिपल्स् एज्युकेशन सोसायटी, जामखेड च्या न्यु इंग्लिश स्कूल, राजुरी विद्यालयाचे मुख्याध्यापक जुलफूकारअली पठाण यांचा सेवा पुर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. तर प्रमुख उपस्थितीत संस्थेचे उपाध्याक्ष अरुणशेठ चिंतामणी, सचिव शशीकांत देशमुख, संचालक सैफूल्ला खान, राजुरी गावाचे संरपंच गणेश कोल्हे, पोलिस पाटील प्रकाश मोरे, ऊर्दू शाळेचे माजी मुख्याध्यापक पठाण, साकतचे मुख्याध्यापक दत्ता काळे, माजी उपमुख्याध्यापक सुभाष घुले, उदयकुमार दाहितोडे, निलेश भोसले, राम कोल्हे, सुभाष बोराटे, जाहेद बागवान, बाबा समुद्रसर, उमराव लटपटे, नवनाथ सदाफूले, हनुमंत राऊत सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
   यावेळी बोलतांना शाळेभोवतालची झाडी, शाळेचे मैदान व शाळेतील स्वच्छता पाहुन मन अगदी प्रसन्न होते.यावरुनच मुख्याध्यापकांचे काम प्रसंशनीय असल्याचे निदर्शनास येते . असे मत व्यक्त केले. 
यावेळी कु. तृप्ती घुले, कु. स्वेता खाडे व कु. तेजस्वीनी खाडे या विद्यार्थीनी मनोगत व्यक्त केते. तसेच शिक्षक
मनोगतात श्री. दत्तात्रय राजमाने यांनी मुख्याध्यापक पठाणसर हे माझे जेष्ठ बंधू बनुन माझ्या सुरवातीच्या कालवधीत मला मार्गदर्शन केल्यामुळे शैक्षणिक कार्यात मला कसलीही अडचण आली नाही असे मत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देतांना मुख्याध्यापक जुलफूकारअली पठाण म्हणाले की, गेली 35 वर्षे मी इमानेइतबारे सेवा
केल्यामुळेच मला संस्थेने पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक पदावर काम करण्याची संधी दिली व शिक्षक,
ग्रामस्थांनी ही वेळोवेळी सहकार्य . त्या बद्दल सर्वांचे आभार मानतो असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
दिपक सुरवसे, सुत्रसंचालन सुनिता पिसाळ मॅडम यांनी तर आभार दिनानाथ शिंदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!