जामखेड न्युज——
निजामाला ज्या ठिकाणी मराठ्यांनी पाणी पाजले दैदिप्यमान विजय संपादन केला तो खर्ड्याचा किल्ला आणी ज्या ठिकाणी लढाई झाली ती रणटेकडी या रणटेकडीचा विकास झाला तरच आपला इतिहास जिवंत राहणार आहे असे प्रतिपादन डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी व्यक्त केले.

जामखेड येथील चेअरमन लान्स मध्ये सेवा समितीच्या माध्यमातून सोहळा विचारांचा आखाड जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. भगवानराव मुरूमकर बोलत होते. यावेळीडॉ. भगवानराव मुरूमकर, सनरायझर्स शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय भोरे, मंगेश (दादा) आजबे, तरडगावचे सरपंच जयराम खोत, महादेव वराट, महारुद्र नेमाने, सेवा समितीचे अध्यक्ष शंकर अप्पा जाधव,राहुल आबा हरगुडे,प्रवीण दादा झांबरे, आकाश शिंदे, तसेच आप्पासाहेब हरगुडे, मुरूमकर, राहुल झांबरे
यांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रल्हाद डिसले सर, खांडवीचे सरपंच मनेश भोसले, प्रा.बहिर सर,कसाब सर,भोंडवे सर,तसेच जामखेड तालुका अध्यक्ष. दादासाहेब मोहिते,कृष्णा डूचे,बळीराम वराट,तसेच सेवा समितीचे सर्व राज्यातील पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
२२७ वर्षापूर्वी खर्डा किल्ला जिंकण्यासाठी आलेला निजाम शत्रू किती लांब आहे हे पाहण्यासाठी मराठे दौंडवाडी येथील रणटेकडी गेले शत्रूचा अंदाज घेतला आणी तिथेच युद्ध झाले संख्येने कमी असलेल्या मराठ्यांनी निजामाच्या सैन्याला येथेच पराभूत केले हाच मराठ्यांचा शेवटचा विजय आहे. त्यामुळे इतिहास जिवंत ठेवण्यासाठी रणटेकडीचा विकास होणे आवश्यक आहे. यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या खासदार निधीतून रस्त्याची मागणी केली आहे. असेही डॉ भगवानराव मुरूमकर यांनी सांगितले.
सेवा संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा ठेवा जपण्यासाठी सेवा संस्थेच्या माध्यमातून सोहळा विचारांचा आखाड जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.
सोशिअल मीडियाच्या आभासी जगात अनेक मित्र भेटतात, नकळतपणे ते आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन जातात, ते सर्व मित्र सेवा समिती परिवाराच्या जडणघडणित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान देत असतात, आखाड जत्रेच्या माध्यमातून सर्व मित्रांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. या सोहळ्याच्या माध्यमातून स्नेह भोजनाबरोबर विचारांची आदान प्रदान झाली









