जामखेड न्युज——
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात , स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक , क्रांतिकारक , स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे , स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी , या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी ” आजादी का अमृत महोत्सव ” अर्थात ” स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” अंतर्गत दि ११ ऑगस्ट , २०२२ ते दि १७ ऑगस्ट , २०२२ या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आष्टी तालुक्यात ” हर घर तिरंगा ” हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आष्टीचे तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

केंद्र शासनाच्या संस्कृति मंत्रालयाने ” हर घर झंडा उपक्रमांतर्गत सर्व शासकीय , निमशासकीय , खाजगी आस्थापना , सहकारी संस्था , शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतींवर व नागरिकांनी स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी करावी.या स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी सकारात्मक प्रभावी प्रसिद्धी मोहिम राबविण्यात यावी यासाठी सुक्ष्म नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात येऊन उपरोक्त कालावधीत सदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात यावा या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय / निमशासकीय यंत्रणांनी प्रसार माध्यमातून जाणीव – जागृतीची मोहिम प्रभावीपणे राबवावी. स्थानिक स्वराज्य संस्था , पोलीस यंत्रणा , शाळा व महाविद्यालये , परिवहन , आरोग्य केंद्रे , स्वस्त भाव धान्य दुकाने , सहकारी संस्था अशा सर्व सामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचा वापर करुन सदर कार्यक्रम यशस्वी करावा , अशा सूचनांचा समावेश आहे .

केंद्र शासनाच्या “ हर घर झंडा ” उपक्रम राबविण्याबाबतच्या.सर्व शासकीय / निमशासकीय यंत्रणांनी प्रसार माध्यमातून देशाभिमान व जाणीव जागृतीची मोहिम प्रभावीपणे राबवावी. दि ११ ते १७ ऑगस्ट , २०२२ या कालावधीत प्रत्येक शासकीय / निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारणेसाठी नागरीकांना प्रोत्साहीत करावे. नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वत : विकत घेऊन उभारण्यासाठी त्यांना प्रेरीत करावे. सदर राष्ट्रध्वज उभारणीसाठी जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी . राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत, पॉलिस्टर,लोकर, सिल्क,खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत असा उल्लेख केला आहे . या बदललेल्या तरतूदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल . संगीतातूनही राष्ट्रध्वजाबाबत वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण करता येईल . ” हर घर झंडा ” या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करावी अशा सूचना तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी दिल्या आहेत.