साकत परिसरातील वनक्षेत्र व गायरान क्षेत्राला लागलेल्या आगीत साठ हेक्टर क्षेत्रावरील गवत व झाडे बेचिराख – चाऱ्यांची टंचाई जाणवणार

0
193
जामखेड प्रतिनिधी 
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट) 
   दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील साकत व सावरगाव परिसरातील गायरान व वनविभागाच्या सुमारे साठ हेक्टर क्षेत्रावरील गवत झाडे बेचिराख झाले यामुळे परिसरातील तसेच साकेश्वर गो शाळेतील गायींना उन्हाळ्यात चाऱ्यांची तीव्र टंचाई जाणवणार आहे. सुमारे सात तासांच्या परिश्रमानंतर गावकरी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आग आटोक्यात आणण्यात यश आले होते.
            जामखेड तालुक्यातील साकत हद्दीलगत वनविभाग शिवारात शनिवारी दुपारी साडेदहा वाजताच्या सुमारास जंगलाला आग लागली यामध्ये वनविभागाचे सुमारे दहा हेक्टर तर सावरगाव ग्रामपंचायतीचे ५० हेक्टर गायरान क्षेत्राचा सामावेश आहे आजपर्यंतचा हा सर्वात मोठा वणवा होता.दरम्यान वनविभागाचे अधिकारी मुख्यालयी थांबत नसल्याने व वनविभागाकडे आग विझवण्याचे साहित्य असूनही वेळेवर उपलब्ध झाले नाही त्यामुळे वनमूजरांनी व ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेऊन आग विझवली याकडे वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे
   या भागात आजीनाथ पुलवळे हे लोकांच्या सहकार्याने श्री साकेश्वर गो शाळा चालवतात सुमारे ७५ गावरान गायी सध्या गो शाळेत आहेत. गायरान क्षेत्र व वनविभागाच्या क्षेत्रातील गवत उन्हाळ्यात या गायींना वरदान ठरत होते आता आगीत सर्व गवत जळून भस्मसात झाले त्यामुळे उन्हाळ्यात या गायींना खाण्यासाठी गवत राहिलेले नाही.
        तालुक्यातील साकत शिवारात वनविभागाचे सुमारे २९ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १० ते १२ हेकटर क्षेत्रात सकाळी साडे दहाच्या सुमारास आग लागल्याची माहिती स्थानिक वन मुजुराने वनक्षेत्रपाल गणेश छबिलवर यांना कळविल्याने त्यांनी वनरक्षक किसान पवार,प्रदीप उबाळे वनमजूर ताहेरअली सय्यद,शामराव डोंगरे,राजू मुरूमकर यांचे पथक तातडीने घटनास्थळी पाठवले ,मात्र आग विजवण्यासाठी लागणारे साहित्य नसल्याने पथकाला मोठे परिश्रम घ्यावे लागले आग विजवण्याचे साहित्य हे वनपाल यांच्या खाजगी खोलीत ठेवण्यात आले होते तसेच वनपाल मुख्यालयी न रहाता ते कायम श्रीगोंदा व कर्जत येथे राहत आहेत त्यामुळे वनरक्षक किसान पवार,प्रदीप उबाळे वनमजूर ताहेरअली सय्यद,शामराव डोंगरे,राजू मुरूमकर यांनी  प्रयत्नांची पराकाष्ठा केला. जीवाची पर्वा न करता ३ किलोमीटर हद्दीलगतची आग सतत सात तासांच्या अविरत प्रयत्नानंतर विझली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून शेजारील शिऊर देवदैठण या वनक्षेत्रात आग न पसरल्याने मोठी हानी टळली.
  दरम्यान, येथील आग प्रतिबंधक दलाचे १० मजूर हे दुपारी २ वाजता घटनास्थळी पोहोचले होते. वनरकक्षक देवकर, आजीनाथ भोसले, वनमजुर आकुश गवळी, बबन महारनोर, किसन बोबडे संजय आडसुळ, माळसीकारे, शहाजी
नहेरकर सह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अनेक धारकरी व परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. तरीही सध्या सुगीची धामधूम असल्याने जास्त लोक नव्हते.
    आग लागण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. ही आग कशामुळे लागली याचा शोध वनविभाग घेत आहेत. या आगीने लाखो रुपयांचे वनविभागाचे नुकसान झाले आहे.
दरम्यान रस्त्याच्या कडेने दोन्ही बाजूला जाळ रेषा करणे आवश्यक आहे परंतु जाळ रेषा आखल्या नव्हत्या. या आगीत मोठ्या प्रमाणावर वन्य जीव होरपळून मृत्यूमुखी पडले असतील याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच अनेक झाडे व गवत जळून भस्मसात झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here