जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला. या वेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्ती, विठ्ठल रुक्मिणी आसे वेश परिधान केले होते ही वेशभूषा दिंडीचे अकर्षण ठरले.
नवीन मराठी प्राथमिक शाळा (लोकमान्य ) येथे शनिवार दिनांक ९ जुलै रोजी सकाळी विठलाच्या पाई वारीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतून सुरु झालेली पायी वारी विठल मंदिरापर्यंत पांडुरंगच दर्शन घेऊन स्नेह भोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी इयत्ता बालवाडी ते नववी पर्यंत च्या सर्व विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. लेझीम, टाळ, झाँज या कर्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,संत निवृत्ती, या वेशभूषेत मुलं सहभागी झालेले होते. आजच्या दिंडी निमित्त शाळेत मुलांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव राजेंद्रजी देशपांडे, संचालक बंडोपंत पवार व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.