सलग पाचव्या वर्षी लटकेवस्ती येथील विद्यार्थ्याची नवोदय साठी निवड 30 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटके वस्ती येथील विद्यार्थ्यांनी साक्षी भागवत निकम हिची जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर साठी निवड झाली.
त्या बद्दल तिचे गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री कैलास खैरे साहेब, नायगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री किसन वराट ,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ लटके व उपाध्यक्ष श्री रामचंद्र लटके, शिक्षणप्रेमी नागरिक श्री राजेंद्र लटके, संभाजी लटके, अशोक पवार,अशोक लटके, श्री भाऊसाहेब लटके, श्री विष्णु लटके शाळेचे मुख्याध्यापक व वर्गशिक्षिका श्रीमती अनिता पवार मॅडम, श्रीमती रसिका गाढवे मॅडम व नायगाव केंद्रातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
सलग 5 वर्षे शिष्यवृत्ती 100%निकाल व सलग 5 वर्षे नवोदय साठी निवड होणारी लटकेवस्ती (शिऊर ) शाळा जिल्हय़ातील एकमेव शाळा आहे.