जामखेड न्युज——
जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.जागतिक अमली पदार्थ दिनानिमित्त ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात चित्रकला व निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
सकाळच्या सत्रामध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या व दुपारच्या सत्रामध्ये निबंध स्पर्धा घेतल्या.

या स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेड पोलीस स्टेशनचे पीआय आदरणीय श्री संभाजी गायकवाड साहेब उपस्थित होते.त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय श्री राजेशजी मोरे खजिनदार दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड,प्राचार्य श्री.श्रीकांत होशिंग, पर्यवेक्षक रमेश अडसूळ, ज्येष्ठ शिक्षक श्री. बाळासाहेब पारखे,श्री प्रवीण गायकवाड,शिक्षक प्रतिनिधी रोहित घोडेस्वार उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमली पदार्थ दिनानिमित्त जामखेड पोलीस स्टेशन यांच्यावतीने ल.ना.होशिंग विद्यालयामध्ये आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या वेळी प्राचार्य श्री.श्रीकांत होशिंग साहेब यांच्या हस्ते आदरणीय श्री. संभाजी गायकवाड साहेबांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये पर्यवेक्षक श्री.रमेश अडसूळ यांनी अमली पदार्थ व त्याचे समाजावर होणारे दुष्परिणाम यावर थोडक्यात माहिती देऊन चित्रकला व निबंध स्पर्धेविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री.संभाजी गायकवाड साहेब यांनी आपल्या मनोगतांमध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने अमली पदार्थ याला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे व समाज कसा सुदृढ होईल लोकांना चांगल्या सवयी कशाला लागतील यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ्या स्पर्धा व विचारांच्या माध्यमातून काम करण्याचे आवाहन केले व अमली पदार्थ व त्याचे होणारे दुष्परिणाम यामध्ये व्यक्ती, कुटुंब,समाज यांचे होणारे नुकसान यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनीच व्यसनाविरुद्ध मनापासून काम केले पाहिजे असे आवाहनही पीआय श्री संभाजी गायकवाड साहेबांनी केले.सर्व स्पर्धकांना साहेबांनी शुभेच्छा देऊन स्पर्धेचे उद्घाटन केले व सर्वांचे अभिनंदन केले.
त्याचबरोबर सकाळच्या सत्रा मध्ये चित्रकला स्पर्धा व दुपारच्या सत्रामध्ये निबंधस्पर्धाचे आयोजन व्यवस्थित केल्याबद्दल आदरणीय श्री.संभाजी गायकवाड साहेबांनी प्राचार्य श्री.श्रीकांत होशिंग साहेब व सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले.
आदरणीय प्राचार्य श्रीकांत होशिंग साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये जामखेड पोलीस स्टेशनचे पीआय श्री. संभाजी गायकवाड साहेब यांनी केलेलेआवाहनाला आमच्या शाळेतील विद्यार्थी उत्तम प्रतिसाद देतील असे सांगून विद्यार्थ्यांनाही अमली पदार्थाच्या विरोधी काम करण्याचे आव्हान केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही स्पर्धेच्या निमित्ताने साधारण 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या नियोजनासाठी समारंभ प्रमुख संजय कदम, कलाशिक्षक राऊत मुकुंद,श्री.भरत लहाने,श्री. बबन राठोड,श्री.कैलास वराट,श्री.विशाल पोले,श्री.साई भोसले ,श्रीमती संगीता दराडे, श्रीमती वंदना अल्हाट,श्रीमती सुप्रिया घायतडक मॅडम उपस्थित सर्व होते.
या स्पर्धेच्या वेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल देडे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री मुकुंद राऊत यांनी केले.