जामखेड न्युज——
आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथील आरोळे वस्ती येथील गरजू अंध व्यक्ती यदा यादव यांना इंदराई प्रहार सदन घर भेट देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींना कपडे व फळे वाटप करण्यात येणार आहेत तरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळी १०.३० वाजता आरोळे वस्ती वरील यदा यादव या गरजू अंध व्यक्तीस इंदराई प्रहार सदन घर भेट देण्यात येणार आहे. शहरातील लोकमान्य वाचनालय येथे सकाळी अकरा वाजता दिव्यांग व्यक्तींना कपडे व फळे वाटप करण्यात येणार आहे. घर भेट तसेच कपडे व फळांचे वाटप संतोष पवार राज्य प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रहार संघटना यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी विमलताई अनारसे महिला प्रदेश अध्यक्षा, लक्ष्मी देशमुख दिव्यांग जिल्हाध्यक्ष, विनोद परदेशी, लक्ष्मण पोकळे, प्रकाश बेरड, देविदास पप्पू येवले, मालोजी शिकारे, श्रीराम शिंदे, गुलाब जांभळे, काकासाहेब पारधे, सुरेश सुपेकर, रामभाऊ शिदोरे, सुनील लोंबे, मुकुंद आंधळे, सुदाम निकत यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक नय्युम शेख, कांतीलाल कवादे, जयसिंग उगले, प्रहार जनशक्ती पक्ष, महिला आघाडी, दिव्यांग सेल, प्रहार सैनिक कल्याण संघ जामखेड हे उपस्थित राहणार आहेत.