जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कडभनवाडी येथील ग्रामदैवत असलेल्या श्री साकेश्वर महाराजांचा चांदीचा मुकुट चोरीला गेला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

श्री साकेश्वर महाराज जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्री साकेश्वर महाराजांचे प्रती मंदिर कडभनवाडी ग्रामस्थांनी केलेले आहे. मंदिरात देवाची मूर्ती व मुर्तीवर चांदीचा मुकुट बसवलेला होता. आज सोमवार सकाळी देवाचे भक्त नामदेव कडभने यांनी मंदिराची स्वच्छता करून मुकुट स्वच्छ केला यावेळी काही लोक तिथे होते कडभने घरी गेले आणि परत एक तासांनी परत आले असता चांदीचा मुकुट नव्हता सगळीकडे पाहिले पण कोठेही सापडला नाही. तेव्हा कडभनवाडी ग्रामस्थ जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी जमा झाले होते. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दहा ते साडेबाराच्या दरम्यान चोरी झाल्याचा अंदाज आहे.

श्री साकेश्वर महाराज देवस्थानची सुमारे ५५ एकर बागायती जमीन कडभनवाडी येथे आहे. ग्रामस्थांनी वाडीत मंदिर बांधले आहे मंदिरात मुर्ती व मुर्तीवर चांदीचा मुकुट बसविलेला होता. तोच मुकुट चोरीला गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांच्या मते एकतर भंगार गोळा करणारे किंवा दारूच्या नशेत कोणीतरी हे कृत्य केले असावे असा अंदाज आहे.
देवस्थान सारख्या पवित्र ठिकाणी आता चोर डल्ला मारू लागले आहेत यामुळे लोक आश्चर्य व्यक्त करू लागले आहेत.