ल.ना.होशिंग ज्यूनियर कॉलेजमध्ये कृषी दिन उत्साहात साजरा

0
430
जामखेड न्युज——
दि.1 जुलै 2022 रोजी कृषी दिन ल.ना.होशिंग ज्युनिअर कॉलेजमध्ये सकाळच्या उत्साही वातावरणामध्ये कृषीदिंडी काढून विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय उद्धव (बापू )देशमुख (अध्यक्ष दी.पिपल्स एज्युकेशन सोसायटी). प्रमुख अतिथी माननीय आर. बी .सुपेकर (कृषी अधिकारी) तसेच पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड (जामखेड).
प्रमुख उपस्थिती संस्थेचे सचिव सन्माननीय शशिकांत जी देशमुख, सहसचिव श्रीयुत दिलीप शेठजी गुगळे तसेच संस्थेचे खजिनदार श्रीयुत राजेश जी मोरे तसेच प्राचार्य श्रीकांत होशिंग सर, उपस्थित होते.
कृषी दिना निमित्त पथनाट्याचे आयोजन उपप्राचार्य जरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.संकेत पवार व प्रा.स्वाती सरडे (खके) यांनी केले तसेच …..कृषी दिंडी सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका यांच्या सहकार्यातून पार पडली.
विद्यार्थिनी कु.निकिता सुरवसे हिने आपल्या मनोगतातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले. शेतकऱ्यांच्या पोरांनी वावर आहे तर पावर आहे असं म्हणत हिंडत बसण्यापेक्षा आपल्या असलेल्या वावरामध्ये पावर कशी निर्माण करता येईल याचा विचार केला पाहिजे. तंत्रज्ञान नावाच्या बंदिस्त शब्दाला आपल्या बापाच्या बांधापर्यंत पोचवून खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात केली पाहिजे असं तिने व्यक्त केलं.
कृषी अधिकारी श्रीयुत आर.बी. सुपेकर यांनी विद्यार्थ्यांना हुमणी किड्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सुधारित तंत्रज्ञान व तुरीच्या पिकाचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेंडे खुडणी यंत्र याचे प्रात्यक्षिक दाखवून शेती विषयी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.
तसेच पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती संदर्भात प्रबोधन केले व अभ्यासाविषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी त्यांचे मनोबल वाढण्यासाठी काही टिप्स सांगितल्या .
सचिव सन्माननीय शशिकांत देशमुख यांनी वसंतराव नाईक यांना महाराष्ट्रातील हरितक्रांती व धवलक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक समजले जाते असे सांगितले ..तसेच त्यांना आधुनिक कृषी प्रधान भारताचे कृषी संत असे संबोधले जाते, शेतकऱ्यांच्या गरजा शेतीमध्ये लागणारे विविध तंत्रज्ञान याचाही विचार करून त्यांनी त्या संदर्भात विविध योजना अमलात आणल्या असे सचिव साहेबांनी सांगितले.
सूत्रसंचालन प्राध्यापक स्वाती सरडे (खके) यांनी केले आभार प्रदर्शन प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी केले .
कृषी दिंडी (प्रभात फेरी) साठी प्रा.सिध्देश्वर पवार , प्रा.विनोदकुमार धुमाळ , प्रा.संकेत पवार, प्रा.प्रल्हाद साळुंके , प्रा.ऋषिकेश खेत्रे, प्रा. सुरज कुलकर्णी, प्रा.धीरज पाटील…तसेच प्राध्यापिका स्वाती सरडे (खके), प्राध्यापिका स्वाती साबळे ,प्राध्यापिका योगिता भोसले. यांनी सहकार्य केले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here