Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ग्रामदैवत साकेश्वर महाराजांच्या नंदीचा करंट लागून मृत्यू ग्रामस्थांची...

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ग्रामदैवत साकेश्वर महाराजांच्या नंदीचा करंट लागून मृत्यू ग्रामस्थांची हळहळ व्यक्त मृतदेहाची गावात मिरवणूक काढत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

0
351
जामखेड न्युज——
   ग्रामदैवत श्री साकेश्वर महाराज देवस्थानच्या नंदीचा वीजेचा करंट लागून मृत्यू झाला आहे त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मृत नंदीची गावात मोठ्या भक्ती भावाने भजनाच्या साथीने मिरवणूक काढण्यात आली व नंदीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
                           ADVERTISEMENT
  परिसरात प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकत गावात श्री साकेश्वर महाराज जागृत देवस्थान आहे. देवस्थानची 55 एकर सुपीक जमीन आहे देवाचा नंदी आहे नंदीची संपूर्ण गावकरी मोठ्या भक्ती भावाने पुजा करतात यात्रेदिवशी व महाशिवरात्रीला पालखी सोहळा असतो यात नंदी सजवून भव्य दिव्य मिरवणूक असते. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध माणसे भक्ती भावाने नंदीची सेवा करतात. याच नंदीचा वीजेचा करंट लागून मृत्यू झाला आहे त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 
                      ADVERTISEMENT
तालुक्यातील साकत येथील जाग्रुत देवस्थान साकेश्‍वर च्या नंदीचा जीव गेला साकत गावात नवीन दलित वस्ती करीता सौर लॅप बसवले आहेत परंतु हे काम अत्यंत निर्कुष्ट दर्जाचे कत्रांदाराकडुन करण्यात आले आहे. आज फक्त गांमपचायतच्या कारभारा मुळे आज महादेवाच्या नंदीचा जीव गेला. तरी गावातील लोकाचेअश्रु अनावर झाले तरी कत्रांदारावर कारवाई करावी अशी साकत गावकर्‍यांची मागणी आहे यावेळी डॉ बाबु वराट, कुष्णा पुलवळे,अशोक वराट गंगाराम घोडेस्वार महेश मुरुमकर सचिन घोडेस्वार, दत्तात्रय मुरुमकर भास्कर मुरुमकर, ग्रामस्थ उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!