जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
बुरझड जिल्हा धुळे येथील श्री क्षेत्र सिद्धेश्वर महाराज यांची गेली १६ वर्षापासून येणारी पायी दिंडी उद्या दि. १ जुलै२०२२ रोजी जामखेड येथे येत आहे. या दिंडीचे स्वागत नेहमीप्रमाणेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आपल्या कोठारी प्रतिष्ठान मार्फत करणार आहेत.

बुरझड ते पंढरपूर जाणाऱ्या दिंडीचे स्वागत परमपूज्य चंदनबालाजी म.सा. आणि परमपूज्य पद्मावतीजी म.सा. आदी ठाणा ६ यांच्या उपस्थितीत आणि यांच्या आशीर्वादाने जामखेड शहरांमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटोदा येथील सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बाळा बांगर हे असणार आहेत. तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार योगेश चंद्रे, एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगरचे संपादक इकबाल शेख, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे (सेवा निवृत्त), दुय्यम निबंधक, मनोज पाटेकर, ह. भ. प. विजयकुमार बागडे, डॉ.अमोल भगत, ॲड. हर्षल डोके, डॉ.सुरेश काशिद, सचीन गाडे हे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी जामखेड येथील सराफ व्यापारी किसनराव चिंतामणी यांना स्वतःचे लिव्हर ट्रान्सफर करणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ. राजश्री किसनराव चिंतामणी यांचा कोठारी प्रतिष्ठान मार्फत सत्कार सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रम महाप्रसाद जेवणाची व्यवस्था महावीर भवन येथे केले आहे. तरी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय कोठारी अध्यक्ष कोठारी प्रतिष्ठान जामखेड आणि कांतीलाल चंदुलाल कोठारी यांनी केले आहे.









