जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
जामखेड येथील प्रसिद्ध व्यापारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक सुरेश माधव कुलथे वय ६३ यांचे दि २८ रोजी पुणे येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले आहे त्यांच्या मागे पत्नी दोन मुले एक मुलगी चार भाऊ तीन बहिणी सुना नातवंडे असा परिवार आहे त्याचेंवर जामखेड येथील तपनेश्वर आमरधाम येथे दि २९ रोजी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुरेश कुलथे यांनी जामखेड तालुक्यात वयाच्या दहाव्या वर्षीपासून माजी जिल्हा संघचालक कै. डॉ. दशरथ खैरनार (दादा) यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. तसेच ते वारकरी संप्रदायातील सर्व उत्सवात सक्रिय असत. भजन प्रवचन, किर्तन हा त्यांचा छंद होता.
तसेच ते पंढरीचे निश्चिम वारकरी होते. ते गेली पस्तीस वर्षापासून संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या दंडीत जात असत. याही वर्षी ते दिंडीत सहभागी झाले होते. सासवड येथे दिंडीत चालत असतांना त्यांना अचानक मेंदू विकाराचा ञास होऊ लागल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्याचें निधन झाले.
कुलथे यांनी दोन वेळा चारधाम याञा तीन वेळा पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. सध्या ते संघाचे जिल्हा धर्माचार्य संपर्क प्रमुख म्हणून काम करत होते.