जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
येथील मदारी समाज बांधव जोपर्यंत त्यांच्या हक्काच्या घरात राहायला जाणार नाही तोपर्यंत मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझा संघर्ष चालूच ठेवणार असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे भटके-विमुक्त समिती राज्य सहसमन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केला.
ADVERTISEMENT

ग्रामीण विकास केंद्र जामखेड व संविधान प्रचारक समिती (कोरो, मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी वस्तीवर आयोजित राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
ADVERTISEMENT 

खर्डा चे सरपंच आसाराम गोपाळघरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी बापूसाहेब माने उपसभापती रवी सुरवसे खरड याचे उपसरपंच श्रीकांत लोखंडे पोलीस उपनिरीक्षक सुनील बडे सरदार मदारी यांच्यासह मदारी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की १ जुलै हा माझा वाढदिवस असतो. परंतु हा वाढदिवस मी साजरा करणार नाही. कार्यकर्त्यांनीही तो साजरा करू नये. जेव्हा माझे मदारी समाज बांधव त्यांच्या हक्काच्या घरात राहायला जातील व त्यांच्या घरात दिवा लागेल तेव्हाच मी वाढदिवस साजरा करेल. मदारी वसाहतीसाठी गेल्या अनेक वर्षापासून माझा संघर्ष सुरू आहे. यापूर्वी आ. प्रा. राम शिंदे यांच्या घरासमोर, आ. रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर, कधी पंचायत समितीमध्ये तर कधी तहसील कार्यालयासमोर मी या प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषण, धरणे, मोर्चा व पाल ठोको आंदोलन केले आहे.
जून महिन्यात खर्डा येथील मदारी वसाहत ते मुख्यमंत्री कार्यालय अशी पदयात्रा काढून मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार होतो. परंतु गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिलेल्या आश्वासनामुळे हे आंदोलन स्थगित केले. आता तर जामखेडला २ आमदार मिळाले आहेत. त्यामुळे आता जर हा प्रश्न मार्गी लागला नाही, तर सकाळी आ. रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर, दुपारी पंचायत समिती समोर आणि संध्याकाळी आ. राम शिंदे यांच्या कार्यालयासमोर मी आंदोलन करील असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
खर्डा येथील मदारी वसाहतीचे काम लवकरात लवकर सुरू करू असे आश्वासन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, उपसभापती रवी सुरवसे व खर्डा चे सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी यावेळी दिले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सुनील बडे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे यांचीही भाषणे झाली. मदारी वसाहतींमधील मुला-मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
विशाल पवार यांनी प्रास्ताविक केले. अजिनाथ शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. अतिश पारवे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आतिष पारवे, नितीन आहेर, कैलास सुके, भिमराव सुरवसे, लखन जाधव, गणपत कराळे, लक्ष्मण शिंदे, जयश्री पवार, गणेश काळे, निता इंगळे, प्रवीण सदाफुले, सरदार चाचा मदारी, हुसेन मदारी, सलीम मदारी, मुस्तफा मदारी यांनी परिश्रम घेतले.