जामखेड न्युज – – – –
इयत्ता १२ पास व त्यापुढे कोणतेही शिक्षण झालेला (कोणत्याही शाळा, काॅलेजमधील) विद्यार्थी टाटा मोटर्स सह
महेंद्रा & महेंद्रा अशा अनेक नामांकित कंपन्यामध्ये नोकरीसाठी आपल्याच गावात मुलाखती देवून नोकरी प्राप्त करु शकतील. दि. २ जून रोजी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत जामखेड महाविद्यालय जामखेड मध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आहे तरी विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड महाविद्यालय जामखेडच्या वतीने करण्यात आले आहे.
जामखेड तालुक्यातील पहिलाच रोजगार मेळावा आहे यात सुमारे पाचशे जणांना नोकरी मिळणार आहे त्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
जामखेड महाविद्यालय जामखेडने खास परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध व्हावी म्हणून नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे तरी परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचा वतीने करण्यात आले आहे.
टाटा मोटर्स मध्ये तिनशे जागा भरल्या जाणार आहेत तसेच महेंद्रा अॅड महेंद्रा मध्ये शंभर, अजय पाॅलीमर मध्ये तीस, असाही ग्लास मध्ये वीस अशा नोकरीच्या संधी आहेत. तरी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील नरके यांनी केले आहे.