जामखेड न्युज – – –
शेतीच्या मशागतीच्या कामांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने नवी योजना राबवली आहे. ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ या योजनेचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे.
केंद्र सरकारकडून मागच्या दोन महिन्यात डिझेलच्या दरात तब्बल १० रुपयांची वाढ केली. यामुळे राज्यात सरासरी डिझेलचे दर (Diesel rate) 105 रुपयांच्या आसपास पोहोचले आहे. डिझेलच्या दर वाढीचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. (Diesel rate and farmer) शेतीच्या मशागतीच्या कामांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने नवी योजना राबवली आहे. ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ (‘Tractor Our Diesel Yours’ scheme for farmers) या योजनेचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे. (farmers scheme)
ADVERTISEMENT 

विधवा, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकऱ्यांना पेरणी ते कापणी दरम्यान सहाय्य व्हावे, व त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी ‘ट्रॅक्टर आमचा, डिजेल तुमचे’, हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे या महिला शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे. ही योजना देशात प्रथमच अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत असून ही योजना राज्याला व देशाला मार्गदर्शक ठरणार आहे. याबाबत कामगार राज्यमंत्री नेते बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे.