जामखेड न्युज – – – –
अभिनेत्री केतकी चितळे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. तिने फेसबूकवर पोस्ट करत शरद पवारांवर टीका केली होती. त्यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकांनी तिला विरोध केला आहे. (ketki chitale ink through)
केतकी चितळेच्या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय वर्तुळातही या प्रकरणावर वातावरण तापलेले आहे. अनेक नेत्यांनी तिच्या पोस्टला विरोध केला आहे. तिला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असे असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
केतकी चितळेवर शाई फेक करण्यात आली आहे. केतकी चितळेला कळंबोली पोलिस ठाण्यात केतकीला नेण्यात आले होते. त्याचवेळी ही धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्यावर शाईफेक केली आहे.
केतकी चितळेला गाडीत बसवत असताना अचानक काही महिला कार्यकर्त्या तिथे आल्या होत्या. त्या खुपच आक्रमक झाल्याअसून त्यांनी तिच्यावर शाईफेक केली आहे. तसेच यावेळी महिला कार्यकर्त्यांनी केतकी चितळे हाय हायच्याही घोषणा दिल्या आहे.
केतकी चितळे पोलिसांच्या गाडीत बसलेली असतानाच तिच्यावर शाईफेक करण्यात आली. काहींनी यावेळी तिच्यावर अंडीही फेकली. तसेच ती यावेळी गाडीतून खालीही पडली होती.पण विशेष म्हणजे शाईफेक झाल्यानंतर केतकी चितळे हसत होती. तसेच आता पोलिस तिच्यावर आणखी कोणती कडक कारवाई कऱणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, केतकी चितळेने शरद पवार यांच्याबाबत फेसबूकवर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये केतकीने शरद पवारांच्या आजारावरुन टीका केली आहे. या कवितेच्या खाली तिने ऍडव्होकेट नितीन भावे असे नाव लिहिले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही केतकीच्या पोस्टचा विरोध केला आहे.