लग्नाआधीच दबंग महिला पोलीस अधिकाऱ्याने जोडीदाराला पाठवलं तुरूंगात

0
210
जामखेड न्युज – – – – 
आसाममधील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्या कर्तव्याला सर्वोतोपरी मानत एका गुन्ह्याखाली आपल्याच होणाऱ्या जोडीदाराला अटक केली आहे. असं करीत तिने कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. पोलीस अधिकाऱ्याला आपल्या होणाऱ्या जोडीदाराबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर तिने त्याला अटक केली आहे.
नॉर्थ ईस्ट क्रॉनिकलनुसार, नागाव जिल्ह्यात जुनमोनी राभा सब-इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. तिने तिच्या होणाऱ्या पतीला म्हणजेच राणा पोगागला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली. राभाने जानेवारी 2021 मध्ये राणा राणाशी साखरपुडा केला होता. या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते लग्न करणार होते.
राणाने जुनमोनी राभाला ऑईल इंडिया लिमिटेडचा पीआर असल्याचे भासवत होता आणि त्याने अनेकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन फसवले आहे. अशी तक्रार राभाला मिळाली.
पोलिसांनी पोगागच्या घरातून ओएनजीसीचे 11 बनावट सील आणि बनावट ओळखपत्रांसह अनेक कागदपत्रे जप्त केली. राभा म्हणाली, ‘मी त्या तिघांची ऋणी आहे जे त्याच्या (राणा पोगग) बद्दल माहिती घेऊन माझ्याकडे आले. तो व्यक्ती किती बनावट आणि खोटारडा आहे. हे लक्षात आल्याने माझे डोळे उघडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here