राज्यातील मंत्री-आमदार कोटींचे थकबाकीदार, भाजपचे जयकुमार गोरे अव्वल

0
203
जामखेड न्युज – – – – 
लोडशेडिंगवरून जनता त्रस्त असताना आता राज्यातील मंत्री, आमदार, खासदारांनी लाखो रुपयांची बिलं थकवल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या यादीत सुरुवातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील नाव होते. मात्र ऊर्जा विभागाकडून थकित वीजबिलांची नवी यादी जाहीर करण्यात आली. या नव्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन तासात ऊर्जा विभागाकडून नवी यादी जाहीर झाली. त्यात अजित पवारांचं नाव वगळ्यात आलं आहे. 30 एप्रिल 2022 पर्यंत राज्यातील अतिमहत्वाच्या आमदार-खासदार आणि मंत्री असे 372 ग्राहकांची एक कोटी 27 लाखांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
कोणी किती बिल थकवलं?आरोग्यमंत्री राजेश टोपे याची 4 लाख रुपये थकबाकीमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात 10 हजार रुपये थकबाकीकॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 2 लाख 63 हजार रुपये थकबाकीराज्यमंत्री विश्वजित कदम यांची 20 हजार रुपयांची वीज बिल थकीत आहेयुवराज संभाजीराजे 1 लाख 25 हजार 934माजी मंत्री सुभाष देशमुख यांची तीन वीज कनेक्शन आहेत. एकूण मिळून 60 हजार रुपये थकबाकी आहे.भाजप आमदार जयकुमार गोरे 7 लाख रुपये थकबाकीमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 2 लाख 25 हजार थकीतकेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे 70 हजार रूपये थकबाकीआमदार समाधान आवताडे एकूण 20,000 थकबाकीआमदार राजेंद्र राऊत बार्शी 3 लाख 53 हजार रूपये थकबाकीआमदार बबनराव शिंदे व त्यांचे आमदार बंधू संजय शिंदे आणि कुटुंबियांची तब्बल 22 वीज जोडणीतील तब्बल 7 लाख 86 हजार रुपये थकीतखासदार रणजितसिंह निंबाळकर यांची चार वीज जोडणीतील 3 लाख रुपयेआमदार संग्राम थोपटे यांची चार विज जोडणीतील 1 लाख रुपये थकीतमाजी खासदार प्रतापराव जाधव दिड लाख रुपये थकीतशिवसेना आमदार सुहास कांदे 50 हजार रुपये थकीतआमदार रवी राणा 40 हजार रुपये थकीतआमदार वैभव नाईक यांच्या औद्योगिक वीज जोडणीची 2 लाख 80 हजार थकबाकीमाजी मंत्री विजयकुमार गावित 42 हजार थकबाकीमाजी आमदार शिरीष चौधरी 70 हजार थकबाकीमंत्री संदीपान भुमरे 1 लाख 50 हजार रुपयांची थकबाकीखासदार रजनीताई पाटील यांची 3 लाख रुपये थकबाकीआमदार प्रकाश सोळंके 80 हजार रुपये थकबाकीआमदार संदीप क्षीरसागर 2 लाख 30 हजार रुपयांची थकबाकीराज्यमंत्री संजय बनसोडे 50 हजार रुपयांची थकबाकीआमदार अशिष जयस्वाल 3 लाख 36 हजार रुपये थकीतआमदार महेश शिंदे 70 हजार रुपयेमाजी मंत्री सुरेश खाडे यांचे कुटुंबीय याची 1 लाख 32 हजार थकबाकीसुमन सदाशिव खोत 1 लाख 32 हजार 435

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here