जामखेड प्रतिनिधी
आमच्या घरातील लहान सहान गोष्टी तुझ्या वडिलांना का सांगते असे म्हणत विवाहीतेला तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती सोहेल कलंदर शेख, दीर आदील कलंदर शेख, सासू आयशा कलंदर शेख, सासरे कलंदर करिम शेख सर्व रा मोगलपुरा जामखेड यांच्यावर गून्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहीता सदफ सोहेल शेख (वय २०) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की पती अहमदनगर येथे खाजगी नोकरी करतात. आमचा वाद कोर्टात चालू असल्याने माहेरी राहत होते. नांदण्यास यावे म्हणून कोर्टाच्या मार्फत नोटीस आल्याने दि ३० मार्च रोजी पतीसोबत नांदण्यास आले. माहेरची आठवण झाली म्हणून पतीच्या फोनवरून दि २९एप्रिल रोजी दूपारी १.३० वा आई वडीलांशी फोनवर बोलत होते. रमजानचे उपवास व तब्येतीची विचारपूस करत असतांना तु आमच्या घरातील लहान लहान गोष्टी वडीलांना सांगते असे म्हणत पतीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सर्व आपसात म्हणाले की हीला मारुन टाका. त्याच वेळी सासुने पलंगातली तलावावर आणा म्हणाले. सासरे यांनी तलवार आणुन आदील कडे दिली तेव्हा माझा जीव जाईल अशा उद्देशाने तलवार गळ्यावर मारली . मी तलवार हूकवली व माझी लहान मुलगी बरीरा हिला घेऊन रडु लागली तेव्हा आजच्या आज संपुन टाका म्हणत घाण घाण शिव्या देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली . जीवाच्या भीतीपोटी मी कोणाला सांगितले नाही. माझे वडील व भाऊ यांनी तु घरी एकटीच का आली असे विचारले तेव्हा घडलेला सर्व प्रकार सांगितला. सदफ शेख यांच्या फिर्यादीनुसार वरील चार जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात करत आहेत.