जामखेड न्युज – – –
पत्रकार संरक्षण कायदा झाला पण आंमलबजावणी नाही. हे दुर्दैव आहे. पत्रकारांना पेन्शन मिळाली पाहिजे फक्त १५० पत्रकारांना पेन्शन मिळते. गेल्या दोन वर्षांत सरकारने एकही प्रश्न सोडविला नाही. फक्त २६०० अधिस्विकृती धारक पत्रकार आहेत आपल्या प्रश्नांसाठी आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल. असे प्रतिपादन एस एम. देशमुख यांनी राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यात केले
आखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित स्व. वसंतराव काणे आदर्श पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय पत्रकार मेळावा गंगाखेड येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्ष मा. एस. एम. देशमुख मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार परिषद, प्रमुख वक्ते मा. विलास बडे वृत्त निवेदक आयबीएन, स्वागताध्यक्ष आ.. डॉ. रत्नाकर गुट्टे, आमदार गंगाखेड, राजेश फड, विजय जोशी, गजानन नाईक, शरद पाबळे, किसनराव भोसले, तुकाराम मुंडे, गजानन नाईक, अंकुश, अनिल महाजन, सुरेश नाईकवाडे, नंदकुमार महाजन, अनिल स्वामी, अनिल महाजन, पिराजी कांबळे, विनायक मुळे,
तसेच सर्व विभागीय सचिव उपस्थित होते.
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागातील पत्रकार चांगल्या प्रकारे काम करतात पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. आज सरकार पत्रकाराबरोबर नाही समाज नाही. त्यामुळे संघटीत होणे आवश्यक आहे. नाहितर आपणास कोणीही वाली नाही. नविन तंत्रज्ञान आत्मसात करा आणी विश्वास संपादन करा पत्रकारांना पेन्शन मिळाली पाहिजे फक्त १५० पत्रकारांना पेन्शन मिळते. गेल्या दोन वर्षांत सरकारने एकही प्रश्न सोडविला नाही फक्त २६०० अधिस्विकृती धारक पत्रकार आहेत आपल्या प्रश्नांसाठी आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल १७ मे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन आहे ते यशस्वी करावयाचे आहे.
यावेळी गंगाखेड येथे विभागवार आदर्श पत्रकार संघ पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी नाशिक विभागात जामखेड तालुका पत्रकार संघास राज्यस्तरीय आदर्श पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाला.

यावेळी बोलताना आयबीएन लोकमतचे वृत्त निवेदक
विलास बडे म्हणाले की, आजच्या पत्रकारीतेची दिशा आणि दशा याविषयी सविस्तर विवेचन केले ग्रामीण पत्रकाराची अवस्था बिकट झाली आहे. प्रमुख वर्तमानपत्रातात ग्रामीण भागासाठी जागा नाही. शहरातील समस्या मांडतात. देश खेड्यांचा आहे पण ग्रामीण भागातील प्रश्न नाहीत हा देश खेड्यांचा आहे पण पण प्रश्नांना जागा नाही. पत्रकारीतेचा कणा ग्रामीण पत्रकार आहे.
ग्रामीण पत्रकारांना संरक्षण नाही, आर्थिक स्थैर्य नाही. ते हवे आहे. माफिया राज मोठ्या प्रमाणावर आहे यांच्याशी दोन हात करण्याची धमक ग्रामीण पत्रकारांमध्ये आहे. पत्रकाराच्या संघटना मोडीत काढण्याचे काम होत आहेत. पत्रकारांना संघटित करण्यासाठी असे मेळावे आवश्यक आहेत. समाजाचे प्रश्न पत्रकार मांडतो पण पत्रकारांचे प्रश्न तसेच राहतात. पत्रकारांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. नविन तंत्रज्ञान आत्मसात करा. विश्वास संपादन करा सत्याची कास धरा. असे सांगितले
यावेळी बोलताना स्वागताध्यक्ष आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार संरक्षण कायदा व पेंशन सुरू केली. बाळशास्त्री जांभेकर स्मारकासाठी भरीव निधी दिला. मतदारसंघातील जनतेचे कामे करत गेलो या मतदारसंघातील लोकांना माझ्या चामड्याचे जोडे केले तरी जनतेचे उपकार फिटणार नाहीत. कोरोना काळात माझ्या मतदारसंघात पुर्णपणे मोफत रेमडेसिवर इंजेक्शन दिले अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटल्या अहोरात्र जनतेची सेवा करत राहणार.
राज्य अध्यक्ष गजानन नाईक – बाळशास्त्री जांभेकर यांचे सिंधुदुर्ग येथे पाच कोटीचे भव्य दिव्य स्मारक उभे राहत आहेत. प्रत्येक जिल्ह्य़ाने आपली वार्षिक वर्गणी भरली पाहिजे असे सांगितले.
किसनराव भोसले – पत्रकारीतेसारखे क्षेत्र जगात दुसरे कोणतेही नाही. अन्याय सहन न होणारच हेच पत्रकार होतात.
गंगाखेड तालुक्यातील पत्रकार संघाने कार्यक्रमाच उत्कृष्ट नियोजन केले होते.