जामखेड प्रतिनिधी
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानमुळे आपल्या सर्व हक्क अधिकार व स्वातंत्र्य मिळाले त्याबाबत आपल्याला सर्व प्रकारचे ज्ञान मिळावे यासाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी संविधान भवने उभारण्याचे महाविकास आघाडीचे धोरण असून याची सुरुवात जामखेड मधुन करण्यात येईल. त्या अंतर्गतच राज्यातील पहिले’संविधान भवन’ जामखेड मध्ये उभारण्यात येईल, ना.धनंजय मुंडे यांचे जाहीर आश्वासन दिले.
काल दि. २५ एप्रिल रोजी जामखेड येथिल राज लॉन्स येथे
लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटपाचा कार्यक्रम सामाजिक न्याय विभागाचे मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी आ. रोहित पवार यांनी जामखेडला भव्य ‘संविधान भवन’ आपण द्यावे अशी मागणी केली. त्या मागणीचा सकारात्मक विचार करून ना. मुंडे यांनी राज्यातले पहिले संविधान भवन या जामखेड मध्ये उभारले जाईल याचे आश्वासन दिले.
चौकट…
जामखेड येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण देताना जयंती उत्सव समितीच्या वतीने राष्ट्रवादी परिसंवाद कार्यक्रमावेळी आ. रोहित पवार मागणी करण्यात आली होती की, बौद्ध विहार, ग्रंथालय, समाजिक सभागृह हे सर्व एकाच ठिकाणी असावे. त्याचवेळी दादांनी होकार दिला होता. या नुसार आज मंत्री महोदयांच्या समोर आ. तशी मागणी केली, त्यांनीही ताबडतोब संविधान भवन जाहीर केले.
या बद्दल ना. धनंजय मुंडे व आ.रोहित पवार यांचे तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने अभार मानले जात आहेत.









