राज्यात दोन दिवसात काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार

0
207

जामखेड न्युज – – – – 

संपूर्ण राज्यात सध्या तापमानात मोठी वाढ होत आहे. विदर्भ आणि मराठवाडा तापमानामुळे हैराण झाले आहे. मात्र, राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २३ एप्रिलपर्यंत राज्य आणि गोव्याच्या काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे तापमानाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार का? हे पाहणे बाकी आहे.

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या विभागात पावसाची हजेरी बघायला मिळू शकते याशिवाय गोव्यामध्ये देखील पावसाचे आगमन होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे या भागात पाऊस आणि वादळी वाऱ्याचे थैमान बघायला मिळू शकते. विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागात जास्तीत जास्त तापमानात वाढ नमूद करण्यात आली आहे. राज्यातील काही भागात मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसेच काही ठिकाणी विजेचा कडकडाट कायम राहणार आहे. याबाबत हवामान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी माहिती सार्वजनिक केली आहे.

या शिवाय कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात देखील तापमानात थोडी वाढ झाली आहे. यामुळेच आगामी काही दिवसात राज्यात तसेच गोव्यात अवकाळी पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, उद्यापासून अर्थात २१ एप्रिल पासून ते २३ एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. यादरम्यान विजेच्या कडकडाटासह वादळी वारे बघायला मिळू शकतात.

या जिल्ह्यात बरसणार पाऊस

२१ आणि २२ एप्रिल रोजी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडेल. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी त्राहिमाम दिसून येतो. तसेच या दोन दिवशी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

२३ एप्रिल रोजीही राज्यात अवकाळी हजेरी कायम राहणार आहे. या तारखेला मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग व पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात 23 तारखेला पावसाची हजेरी बघायला मिळू शकते असा हवामान विभागातील एका वरिष्ठ शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here