Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून जामखेड व कर्जतमधील माता भगिनींसाठी खेळ पैठणीचा महिला...

आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून जामखेड व कर्जतमधील माता भगिनींसाठी खेळ पैठणीचा महिला अस्मितेचा कार्यक्रमाचे आयोजन 

0
365
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – – – 
आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून आपल्या जामखेड व कर्जत मतदारसंघातील माता भगिनींच्या कला गुणांना वाव देण्यासाठी खेळ पैठणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दिवसभराच्या कामातून महिलांना विरंगुळा मिळावा, त्यांच्या कला, आवडी निवडी जोपासण्यात याव्या हे जाणून रोहित पवारांनी दोन्ही तालुक्यात मिळून एकूण १८ ठिकाणी खेळ पैठणीचा महिला अस्मितेचा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याचा श्री गणेशा येत्या १८ एप्रिल २०२२ रोजी, खर्डा इंग्लिश स्कूल, खर्डा येथे संध्याकाळी ४ ते ७.३० वाजता होईल.
यामध्ये विविध खेळ, कलागुणांनाचे सादरीकरण करण्यात येईल याच बरोबर विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीसे देण्यात येतील त्यामध्ये पैठणी, सोन्याची नथ व इतर ही अनेक बक्षीस जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. तसेच, उपस्थित सर्वच भगिनींना रोहित पवारांच्या माध्यमातून आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे (सर्व कार्यक्रमांची वेळ ४ ते ७.३० राहील)
१. सोमवार १८ एप्रिल – खर्डा
कार्यक्रमाचे ठिकाण- खर्डा इंग्लिश स्कुल, खर्डा
२. मंगळवार १९ एप्रिल – नान्नज
कार्यक्रमाचे ठिकाण- नंदादेवी विद्यालय, नान्नज
३. बुधवार २० एप्रिल –  जामखेड शहर
कार्यक्रमाचे ठिकाण- ल.ना.होशिंग विद्यालय, जामखेड
४. गुरुवार २१ एप्रिल – अरणगाव
कार्यक्रमाचे ठिकाण- अरनेश्वर विद्यालय, अरणगाव
५. शुक्रवार २२ एप्रिल – साकत
कार्यक्रमाचे ठिकाण- जिल्हा परिषद शाळा साकत
६. शनिवार २३ एप्रिल – नायगाव
कार्यक्रमाचे ठिकाण- श्री नाथ मंदीराच्या शेजारी, नायगाव
७. रविवार २४ एप्रिल – जवळा
कार्यक्रमाचे ठिकाण- छत्रपती शिवाजी विद्यालय, जवळा
कर्जत – जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सौ. सुनंदा पवार यांनी पंचक्रोशीतील सर्व माता भगिनींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!