जामखेड न्युज – – – – –
स्वतःच्या रक्ताची रंगपंचमी करून हिंदूस्थान नावाचा देश व हिंदू नावाचा धर्म ज्यांनी आत्मबलिदान देऊन जगाच्या नकाशावर अबाधित ठेवला. ज्यांच्या समर्पणामुळे, ज्यांच्या बलिदानामुळे आज आपल्या दारात तुळस आहे, घरात माय भगिनींच्या कपाळी हळदी कुंकु आहे, गावात मंदीरे आणी मंदीरात देव आहेत, गोठ्यात गाय आहे. ज्यांच्या बलिदानामुळे आपण स्वताःला हिंदु म्हणून घेतो, देशाचे नाव हिंदुस्थान लावतो, आपल्या यात्रा, दिवाळी, दसरा, नवरात्र, गुढीपाडवा हे सर्व काही ज्यांच्या बलिदानामुळे टिकले आहे, ज्यांच्या बलिदानामुळे हिंदुस्थानचा पाकीस्तान होण्यावाचुन वाचला, ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वताःच्या देशात हिंदु म्हणुन ताठ मानेने जगतोय अशा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची तिथी नुसार शुक्रवार दि. १ एप्रिल फाल्गुन अमावास्या अर्थात मृत्युंजय अमावस्येला जामखेड शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड यांच्या माध्यमातून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
संभाजी महाराजांना अत्यंत क्रूर मरण यातना देत ३० दिवस छळ करून औरंगजेबाने त्यांची हत्या केली होती. देहाचे तुकडे करून नदी शेजारी टाकण्यात आले होते संभाजी महाराज पकडले गेलेल्या क्षणापासून अति क्रूर पाशवी छळ सहन करत होते श्री संभाजी महाराजांचा रोज एक एक अवयव तोडत होते रोज अंगाची साल सोलून काढत होते शेवटी फाल्गुन अमावस्या च्या दिवशी पायापासून डोक्यापर्यंत त्यांचे तुकडे तुकडे केले. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी देव, देश, धर्मासाठी तब्बल ३० दिवसाचे सूर्याच्या प्रकाशालाही लाजवेल असे तेजस्वी बलिदान दिले म्हणजेच छत्रपती श्री संभाजी महाराज मृत्यूच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर संपूर्ण महिनाभर रोजच अति धीरोदत्त पणे चालत होते म्हणून या संपुर्ण महिन्यामध्ये म्हनजे फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून ते फाल्गुन अमावास्यासे पर्यंत सर्व धारकरी व शिवभक्तांकडुन बलिदान मास पाळला गेला शेवटी बलिदान च्या दिवशी म्हणजेच फाल्गुन अमावस्येला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधीस्थळ वढू बुद्रुक या ठिकाणाहून आणलेल्या ज्वाला घेऊन शंभूराजांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेच्या व बलिदानाच्या स्मरणार्थ जामखेड शहरातुन मूक पदयात्रा काढण्यात आली.
संध्याकाळी ७ ते ९ या वेळी विठ्ठल मंदिर येथे आळदीचे ह. भ. प. अशोक पवार महाराज यांचे शिवशंभु चरित्रावर सुंदर असे किर्तन झाले त्यानंतर शिवप्रतिष्ठान चे प्रमुख पांडुराजे भोसले यांनी धारकर्यांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना म्हणाले की आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरूजींनी हा धर्मवीर बलीदान मास हिंदुस्थानातील ज्या ज्या गावात सुर्य ऊगवतो त्या त्या गावात व प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनें हा धर्मवीर बलीदान मास अत्यंत कडवट पणे पाळला पाहीजे, तरच देव, देश, व धर्म टिकुन राहील ही जी प्रेरणा दिली आहे तेच काम श्रीशिवप्रतिष्ठान च्या माध्यमातून आम्हीही यापुढे अविरत कार्य करत राहणार आहोत व यातुनच निर्व्यसनी व सदृढ धर्म प्रेमी नवीन पिढी निर्माण होईल असे मार्गदर्शन केले यानंतर ध्येयमंत्र, व आरती करून शंभुमाहाराजांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी हिंदु बांधव माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.