मराठा समाजाची तिनशे वर्षापासूनची वंशावळ, गोत्र, कुलदैवत माहिती असणारे राजस्थान येथील भाट नगर जिल्ह्यात

0
970
जामखेड न्युज – – – – –
नगर जिल्ह्यातील मराठा समाजाची वंशावळ माहित
असलेले -श्री ब्रम्हभाट हे राजस्थान येथून आलेले आहेत. गेल्या या तिनशे वर्षापासूनची वंशावळ, गोत्र, कुलदैवत, देवी याची सर्व माहिती त्यांच्याकडे आहे. ज्यांना कोणाला आपले कुलदैवत, गोत्र, वंशावळ, देवक यांची माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन विजयकुमार ब्रम्हभाट  यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले 
   ज्यांना आपली वंशावळ, गोत्र, कुलदैवत याची माहिती काढून घ्यावयाची आहे त्यांनी  खालील नंबर वर संपर्क करून आपल्या पुर्वज व कुलदैवत गोत्राविषयी माहिती जाणून घ्यावी असे आवाहन  मराठा समाजातील बांधवाना केले आहे.
संपर्कासाठी फोन नंबर  विजयकुमार ब्रम्हभाट  – 8279295728

आजची आधुनिक पिढी आपल्या घराण्याविषयी अनभिज्ञ आहे. फार तर आजोबा-पणजोबापर्यंत वंशावळ माहिती असते. परंतु नगर जिल्ह्यातील जवळपास ७ हजार मराठा समाजातील घराण्यांचा संपूर्ण इतिहास राजस्थानातील भट परिवाराने ३०० वर्षांपासून जतन केला आहे. आता ही वंशावळ एकत्रितपणे हस्तलिखित स्वरूपात लवकरच सर्वांना पाहता येणार आहे. यात आपले गोत्र, देवक, मूळ गाव, कुलदेवता याची महिती असणार आहे.

आम्ही दर पाच वर्षांनी येतो. जे बोलवतात त्यांची वंशावळ आम्ही सांगतो. नवी माहिती समाविष्ट करतो. आमच्या पूर्वजांनी मोडी लिपीत ही माहिती लिहून ठेवली आहे. आम्ही नव्या पिढीने ही लिपी शिकली आहे. नवीन माहिती आम्ही देवनागरी लिपीत लिहीत आहोत. वंशावळी संरक्षण संस्था राजस्थान ही आमची वेबसाईट आहे.-विजयकुमार ब्रम्हभट, राजस्थान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here