लॉकडाउनच्या काळात दाखल सर्व गुन्हे मागे घेणार – ठाकरे सरकारचा निर्णय

0
156
जामखेड न्युज – – – 
लॉकडाउन काळात नियमांचं उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थी, नागरिकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गृह विभागाने या विद्यार्थी तसंच नागरिकांवर कलम १८८ अंतर्गत दाखल सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाकडून या निर्णयाला मान्यता मिळाल्यानंतर प्रक्रियेला सुरुवात होईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
                     ADVERTISEMENT
.
दिलीप वळसे पाटील यांनी  या निर्णयासंबंधी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “कोविडच्या काळात ज्या नागरिंक किंवा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना पासपोर्ट मिळवताना, परदेशात जाण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही तत्वत: १८८ अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे आम्ही मागे घेणार आहोत. मंत्रिमंडळात हा विषय मांडला जाईल”.
बैलगाडा शर्यतीसंबंधी गुन्हेही मागे घेण्याचा निर्णय
“राजकीय किंवा बैलगाडा शर्यतीसंबंधी गुन्हे असतील तर ते मागे घेण्यासंबंधी निर्णय झाला आहे. प्रक्रियेप्रमाणे सर्व जिल्हा प्रमुखांकडून शासनाकडे निर्णय येईल त्यानंतर सरकार निर्णय घेईल आणि नंतर कोर्टात जाऊन गुन्हे मागे घेतले जातील,” असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here