जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, कर्जत जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख तसेच जामखेड महाविद्यालयातील प्राध्यापक मधुकर राळेभात यांना पुणे येथील वारकरी सेवा प्रतिष्ठानचा २०२१ चा राज्यस्तरीय ” वारकरी सेवा पुरस्कार” जाहीर झाल्याचे वारकरी सेवा प्रतिष्ठानचे सचिव उदयसिंह राजपूत यांनी नुकतेच पत्राद्वारे कळविले आहे.
ADVERTISEMENT
सन्मानपत्र, स्मृती चिन्ह, शाल श्रीफळ,व रोख रक्कम असे पुरस्कारांचे स्वरूप असून सात एप्रिल २०२२ रोजी कवलापूर जि. सांगली येथे पुरस्कारांचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात येणार आहे असे अध्यक्ष ह.भ.प.बळीराम महाराज आळंदीकर कळविले आहे. पुरस्कार योजनेचे हे सहावे वर्षे असून प्रा.मधुकर राळेभात यांच्या प्रतिवर्षी धाकटी पंढरी( धनेगाव) दिंडीचे निस्वार्थ आध्यात्मिक कार्याची तसेच परिसरात करत असलेल्या समाजसेवेची
दखल घेऊन व गेले पस्तीस वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात निस्वार्थभावाने केलेल्या कार्याची नोंद घेऊन संयोजन समितीने राज्यस्तरीय वारकरी सेवा पुरस्कार घोषित केला आहे.
प्रा.राळेभात यांना पुरस्कार मिळाले बद्दल आमदार रोहित पवार, आमदार संग्राम जगताप मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.आ.य.पवार, जिव्हाळा फौंडेशनचे संतोष पवार, गुलाबराव जांभळे, भानुदास बोराटे, जामखेड महाविद्यालयाने प्राचार्य सुनील नरके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी सभापती दत्तात्रय
वारे, सूर्यकांत नाना मोरे, माजी सभापती संजय वराट,
विजयसिंह गोलेकर, हरिभाऊ बेल्हेकर, फिरोज बागवान, महालिंग कोरे, दीपक पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.