जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद हे युवकांचे प्रेरणास्थान आहेत. तरूणांमध्ये त्यांची एक वेगळीच ओळख आहे. आज त्यांचा वाढदिवस यानिमित्ताने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित साकत गोशाळेत चारा वाटप करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना डब्बा पिशवी वाटर बॅग वाटप करण्यात आले तसेच सायंकाळी जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने संजय काशिद यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT 

८०% समाजकारण व २० % राजकारण यानुसार जामखेड तालुक्यातील शिवसेनेचे कामकाज सुरू आहे. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद हे आपल्या सहकार्यासह नेहमीच आघाडीवर असतात.
शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी साकत येथिल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित गोशाळेत गायींना चारा वाटप करण्यात आले या गोशाळेत नव्वद गायी आहेत यांना हिरवा चारा देण्यात आला संजय (काका) काशीद यांनी वाढदिवसानिमित्त स्वतः साकत येथे गोशाळेत चारा वाटून वाढदिवस साजरा केला त्यावेळी अवि (दादा) बेलेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाप्रमुख पांडू राजे भोसले, कैलास खेत्रे, बाळासाहेब जगदाळे, जगन्नाथ मेत्रे, सागर गुंदेचा, खंडागळे नाना, ओंकार राऊत व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.
बटेवाडी जिल्हा परिषद शाळेत डब्बा पिशवी, वॉटर बॅग वाटप करण्यात आले त्यावेळी काकांचा सत्कार शाळेतर्फे करण्यात आला संजय काका काशीद यांच्या वाढदिवसानिमित्त अवि दादा बेलेकर यांनी शाळेत संजय काशिद यांच्यढ वाढदिवसानिमित्त डब्बा पिशवी वॉटर बॅग वाटप करण्यात आले त्यावेळी नानासाहेब टकले, काकासाहेब जगताप, सचिन टकले, विकास ससाने, राहुल टकले, युवराज कोकरे, जगदंब प्रतिष्ठान अध्यक्ष सागर गुंदेचा, बाळासाहेब जगदाळे, कैलास (आबा) खेत्रे, महेश निमोंकर, किशोर काळे,नवनाथ उबाळे शाळेचा सर्व स्टाफ उपस्थित होते.
जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने सायंकाळी संविधान चौकात अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गोशाळेत हिरवा चारा तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले अशा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.