जामखेड न्युज – – – –
आज जामखेड येथील खर्डा चौक येथे बहुजन हृदय सम्राट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय.ॲड. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्यावरती चुकीच्या बदनामीचा आरोप करणारे शिवसेनेचे आमदार भ्रष्टाचारी, नालायक, मटका, जुगार चालवणारे लोकांचे घरे उद्धवस्त करणारे संतोष बांगर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती. एक हजार कोटी रुपये घेतले असे बिन बुडाचे खोटा आरोप केल्यामुळे या आरोपाची सखील चौकशी करून संबंधित शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करावा इत्यादी मागणीसाठी जामखेड तालुक्यातील भटके विमुक्त संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते खेड्या पाड्यातून तळागाळातील कार्यकर्ते जामखेड येथील खर्डा चौकात या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ जामखेड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहिर संबंधित आमदाराच्या पुतळ्याला जोडे मारुन निषेध नोंदवण्यात आला.
ADVERTISEMENT

यावेळी ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले कि बाबासाहेबांच्या नातवावरती चुकीचे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे .तुमचे जे आरोप आहे. तुमचे जे म्हणणे आहे. ते सूर्यावरती थुंकल्यासारखे आहे. बाळासाहेब आंबेडकर एक इज्जतदार इनामईतबारी नेते आहेत. येथील तमाम गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते आहे. संतोष बांगर जे काही बोलले ते गावठी दारू पिऊन बोलले आहे. अशी त्यांनी भूमिका मांडण्यात आली, जोपर्यंत आरोपीची सखोल चौकशी करुन साहेबांची जाहिर माफी मागत नाही तोपर्यंत अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्याना जिल्ह्यात फिरुन देनार नाहीत असे सत्ताधाऱ्यांना आव्हान करण्यात आले,
लोकाधिकार आंदोलन प्रवक्ते बापू ओहोळ यांनी या आंदोलनाची भूमिका सर्वांना समजावून सांगितली.
यावेळी उपस्थित ॲड. डॉ. अरुण आबा जाधव (भटके-विमुक्त राज्य समन्वयक महाराष्ट्रराज्य ) , बापू ओव्हाळ ( लोकाधिकार आंदोलन प्रवक्ते), योगेश सदाफुले ( जि. उपाध्यक्ष दक्षिण वंचित बहुजन आघाडी) , भीमराव चव्हाण ( जि. संघटक दक्षिण वंचित बहुजन आघाडी), आतिश पारवे ( ता. अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी), गणेश धायतडक ( उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ) अक्षय समुद्र कार्याध्यक्ष वंचित बहुजन आघाडी)
मंगेश घोडेस्वार ( रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष ), अजिनाथ शिंदे( शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी), सुधीर कदम ( शहर उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ), संतोष चव्हाण सर,विशाल पवार ( लोकाधिकार आंदोलन तालुका अध्यक्ष), द्वारका पवार ( लोकाधिकार आंदोलन महिला अध्यक्ष ),बाजीराव गंगावणे, सचिन भिंगारदिवे,अतुल ढोणे,वैजीनाथ केसकर, सुदाम शेगर, हमीद नालबंद, बाबा लोहार, आयकाश काळे, विशाल समिदर, दादासाहेब ( फैजी) गंगावणे, अरुण डोळस, गणपत कराळे, शहानुर काळे, भीमराव सुरवसे, लाला वाळके, अण्णा पवार, दत्तात्रय काळे, कल्याण आव्हाड, लताबाई काळे, मनीषा भोसले, शारदा काळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.