महाविकास आघाडी सरकार म्हणजे राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत शिवसेना बायकोच्या तर काँग्रेस बिनबुलाये वऱ्हाडी- सुजय विखे

0
184
जामखेड न्युज – – – 
शिवसेना आणि भाजपचा (Bjp-Shivsena Alliance) मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर काडीमोड झाला. त्यानंतर राज्यात महाविकास (Mahavikas Aghadi) आघाडी स्थापन झाली. गेली अडीच वर्षे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस सरकार चालवत आहे. मात्र या आघाडीवर भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी घणाघाती टीका केली आहे. तसेच ईडीच्या कारवाईवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. महाविकास आघाडीचा संसार असा आहे, लग्न हे राष्ट्रवादी शिवसेनेचं आहे , राष्ट्रवादी हे नवऱ्याच्या भूमिकेत आहे, शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे तर काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत, त्यांना कितीही बोललं तरी हे जेवणाचा ताट सोडायला तयार नाहीत अशी टीका भाजप खासदार सुजय विखे यांनी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून यावर जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
                     ADVERTISEMENT
 
ईडीच्या कारवाईवरूनही हल्लाबोल
त्याचबरोबर राज्यातील ईडीच्या कारवाईवरून देखील त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आम्ही तर त्यांना चोऱ्या करायला सांगितले नव्हते, ज्यांनी चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कारवाई तर होणारच असं मत सुजय विखे यांनी व्यक्त केलं आहे. तर देशाचे पंतप्रधान म्हणतात की मी चौकीदार हूं त्यामुळे देशाचं संरक्षण करणं त्यांचं कर्तव्य आहे. जर तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल तर पुरावे द्यावे, टीव्हीवर येऊन बोलण्याची काय गरज आहे असं विखे म्हटलंय. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ईडीने कारवाईचा धडका लावला आहे. त्यावरून महाविकास आघाडी आणि भाजप अनेकदा आमनेसामने आले आहेत. त्यावरच आता सुजय विखे यांनीही अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
अजून खूप मोठी यादी तयार
किरीट सोमय्या यांना काल पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबद्दल बोलताना , केंद्रीय मंत्र्यांना अटक करताना राज्य सरकारने कोणताही विचार केला नाही. आम्ही केवळ दोन मंत्री उचलले तर तुमची एवढी तळतळ होते, अजून तर खूप मोठी लिस्ट आहे असं विखे म्हणाले. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या निधीतून अहमदनगर जिल्ह्यात जे रस्त्याचे काम झाले. त्याचे श्रेय राष्ट्रवादीचे काही आमदार घेतात. त्यांनी जराशी नैतिकता बाळगायला हवी असं म्हणत नाव न घेता त्यांनी आमदार रोहित पवार त्यांच्यावर निशाणा साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here