खाजगी बस जळून खाक, पस्तीस प्रवासी सुखरूप

0
162
जामखेड न्युज – – – 
पाथर्डी तालुक्यातील कल्याण -निर्मल (विशाखापट्टण) राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. बसला पाठीमागून आग लागल्याचे बसच्या मागे असलेल्या वाहन चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाला आग लागल्याची कल्पना दिल्यांनतर बस रस्त्याच्या बाजूला घेऊन प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
बसमध्ये तीस ते पस्तीस प्रवासी प्रवास करत होते. यात लहान मुलांचाही समावेश होता मात्र प्रसंगावधान साधत या सर्व प्रवाशांना तात्काळ बसमधून बाहेर काढण्यात आले.
बसमध्ये असलेले प्रवाशांचे धान्य पूर्णपणे जाळून गेले होते. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे स.पो उपनिरिक्षक कुमार कराड,पो. कॉ.संदीप कळमकर,किशोर पालवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.
पाथर्डी नगरपालिकेच्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत बस पूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here