तालुक्याच्या सर्वागीण विकासासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम करणे आवश्यक – सभापती राजश्रीताई मोरे

0
219
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – – – 
तालुक्याचा सर्वागीण विकास करण्यासाठी व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे तरच
तालुक्याचा गावांचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास पंचायत समिती जामखेड च्या सभापती राजश्रीताई मोरे यांनी व्यक्त केला.
      पंचायत समितीच्या वतीने आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा निरोप समारंभ कार्यक्रम तसेच शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे व गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांचा सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंचायत समिती जामखेडच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल 20 मार्च रोजी संपुष्टात येत आहे तसेच पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल 13 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. या निमित्ताने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी सभापती राजश्री मोरे, उपसभापती मनीषा सुरवसे, पंचायत समिती सदस्य डॉक्टर भगवानराव मुरूमकर, प्राध्यापक सुभाष आव्हाड , तसेच जिल्हा परिषद सदस्य वंदना लोखंडे, सोमनाथ पाचरणे, सूर्यकांत मोरे, रवी सुरवसे, कर्जतचे जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार, महिला व बालविकास अधिकारी ज्योती बेल्हेकर, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे उपस्थित होते.
     यावेळी बोलताना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की मागील काही दिवसात काम करत असताना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी प्रशासनाला सर्वतोपरी मदत केलेली आहे. त्यांच्या सहकार्यामुळे व मार्गदर्शनामुळेच प्रशासनाला अधिक चांगल्या पद्धतीने काम करता आले. घरकुल विभाग,  रोजगार हमी विभाग अशा विभागांमध्ये जामखेड तालुक्यामध्ये अतिशय नाविन्यपूर्ण काम पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळेकर यांनी केले. आभार प्रदर्शन कृषी अधिकारी अशोक शेळके यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here