रेटून ‘फेकणं’ ही भाजपाची नेहमीची सवय – आमदार रोहित पवार

0
210
जामखेड न्युज – – – – 
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं उद्धाटन झालं आहे. त्यासाठी शहरात मोठी तयारी करण्यात आली होती. या कार्यक्रमावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. या उद्घाटन कार्यक्रमावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही टीका करत इशारा दिला होता. मेट्रोच्या अर्धवट कामाचं उद्घाटन होतंय, काही संकट निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल, असं शरद पवार यांनी PM मोदींना उद्देशून म्हटलं होतं. त्यानंतर भाजपकडून पवारांचा मेट्रोतील फोटो ट्विट करत टीका करण्यात आली होती. या टीकेचा रोहीत पवारांनी समाचार घेतला आहे. रेटून ‘फेकणं’ ही भाजपाची नेहमीची सवय आहे असे आमदार रोहित पवार म्हणाले
आदरणीय शरद पवारजी, 50 वर्षांच्या राजकारणात तुम्ही किती किलोमीटरचे मेट्रो प्रकल्प पुण्यात केले? ज्यांनी केलं त्यांचं कौतुक करण्यासाठी तरी मनाचा मोठेपणा दाखवा! ट्रायलसाठी लगबगीने गेलात, आता म्हणता अर्धवट काम? पवार साहेब हा फोटो पुणे मेट्रोतील आहे. असं म्हणत भाजपने टीका केली होती. त्यावर रोहीत पवारांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. रेटून ‘फेकणं’ ही भाजपाची नेहमीची सवय असं म्हणत भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here