Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या नगर जिल्ह्यातील टॅकर घोटाळाप्रकरणी या कंपनीवर गुन्हा दाखल

नगर जिल्ह्यातील टॅकर घोटाळाप्रकरणी या कंपनीवर गुन्हा दाखल

0
271
जामखेड न्युज – – – 
अहमदनगर जिल्ह्यातील निम्मा भाग हा दुष्काळी समजला जातो. त्यामुळे जिल्ह्याला उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरची आवश्यकता भासते. जिल्ह्यातील काही गावे अशी आहेत की त्यात नेहमीच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. अहमदनगर जिल्ह्यात चिक्की घोटाळ्यानंतर टँकर घोटाळ्याची चर्चा सुरू झाली आहे. या टँकर घोटाळ्यात फसवणुकीचा गुन्हा पारनेर पोलिस ठाण्यात दाखल झाला असून या घोटाळ्यात पारनेर तालुक्यातील एका कंपनीवर आरोप ठेवण्यात आला आहे. ( Name of Suresh Pathare’s company in front in tanker scam case: Crime filed )
अहमदनगर जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये दुष्काळी परिस्थिती होती. याच कालावधीत पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या खेपा बोगस दाखवून मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले. या आरोपांवरून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद रुपनर यांच्या फिर्यादीवरुन बुधवारी (ता. 2) पारनेर पोलिस ठाण्यात पुरवठा करणाऱ्या साई सहारा इन्फ्राण्ड फसिलिटी प्रा. लि. यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही कंपनी उद्योजक सुरेश पठारे यांची आहे. सुरेश पठारे हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे माजी स्वयसहाय्यक आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात 2019 साली निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठ्यावर तब्बल 102 कोटी रुपयांचा खर्च झाला होते. जिल्ह्यात 2019 मध्ये जिल्ह्यातील बहूतांश तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा टॅंकरने पाणी पुरवठा केला जात होता. जिल्ह्यातील विक्रमी टँकर त्या कालावधीत धावले. त्यावेळी 800 पेक्षा अधिक टॅंकरने जिल्ह्यात पाणी पुरवठा झाल्याची कागदोपत्री नोंद आहे.
त्यावर्षी पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरने खेपा कमी करुन जास्त दाखवल्या, आंतरातही घोळ केला, तसेच अन्य त्रुटीतून टॅंकर घोटाळा केल्याचा आरोप करत निघोज (ता. पारनेर) येथील लोकजागृती शोध प्रतिष्ठानने तक्रार करुन चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी हे प्रकरण बरेच गाजले होते.
शासनाने या प्रकाराच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय चौकशी समिती नियुक्त करुन चौकशी केली. समितीने विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना हा अहवाल अवलोकनासाठी पाठवला. त्या शासनाच्या करारनाम्याचा भंग केला. खेपा न भरता त्या भरल्याचे दाखवत अतिरिक्त रक्कम घेऊन शासनाची फसवणूक केल्याचे व गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद रुपनर यांच्या फिर्यादीवरुन बुधवारी (ता. 2) पारनेर पोलिस ठाण्यात पुरवठा करणाऱ्या साई सहारा इन्फ्राण्ड फसिलिटी प्रा. लि. यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान आम्ही मांडलेल्या 13 मुद्यांपैकी काही मुद्यावरच अहवाल दिला आहे. बाकी मुद्याला बगल दिली असून त्याबाबत आम्ही न्यायालयात म्हणणे मांडणार असल्याचे लोकजागृती शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!